​तुम्हाला माहीत आहे का बिन कुछ कहे फेम निखिल सबरवाल खऱ्या आय़ुष्यात आहे पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 13:02 IST2017-06-05T07:32:09+5:302017-06-05T13:02:09+5:30

निखिल सबरवाल सध्या बिन कुछ कहे या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारत असून त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत ...

Do you know that something Fame Nikhil Sabarwal is in real life pilot | ​तुम्हाला माहीत आहे का बिन कुछ कहे फेम निखिल सबरवाल खऱ्या आय़ुष्यात आहे पायलट

​तुम्हाला माहीत आहे का बिन कुछ कहे फेम निखिल सबरवाल खऱ्या आय़ुष्यात आहे पायलट

खिल सबरवाल सध्या बिन कुछ कहे या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारत असून त्याच्या अभिनयाचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहेत. निखिल हा अभिनेता असण्यासोबतच एक पायलट देखील आहे हे खूपच कमी जणांना माहिती आहे. 
निखिल हा सर्टिफाइड कमर्शिअल व्यवसायिक पायलट असून तो फिलिपाईन्समध्ये सेस्त्रा एअरक्राफ्ट्ससाठी अनेक वर्षं काम करत होता. पण लहानपणापासूनच टिव्हीवर झळकण्याची त्याची इच्छा असल्याने तो अभिनयाकडे वळला. फिलिपाईन्समध्ये अनेक वर्षं काम केल्यावर निखिल भारतात परतला आणि अभिनयक्षेत्राकडे वळला.
भारतात आल्यावर तो मॉडलिंग करायला लागला आणि त्यानंतर तो टिव्हीकडे वळला. मॉडलिंगमुळेच त्याला बिन कुछ कहे या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. याविषयी निखिल सांगतो, मी फिलिपाईन्समधील फ्लाईंग स्कूल एस पायलट्स एव्हिएशन अॅकॅडमीमध्ये एअरक्राफ्ट्स उडवायला शिकलो. इंजिनियरची पदवी घेतल्यानंतर मी 2007 साली एव्हिएशनमध्ये आठ महिने प्रशिक्षण घेतले. मी तिथे एका एअरलाइन्ससोबत काम करत होतो. त्यानंतर काही वर्षांनी मी भारतात आलो आणि माझे लायसन्स कन्व्हर्ट करून घेतले.  त्याचवेळी मंदीला सुरुवात झाली होती. मी माझ्या शालेय जीवनात आणि कॉलेजच्या जीवनात मॉडलिंग केले होते. मला नेहमीच अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी फिलिपाईन्सहून आल्यानंतर देखील माझे मॉडलिंग सुरूच ठेवले. मी अनेक जाहिरातींमध्ये काम केले. त्यानंतर मी एका चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आणि त्यानंतर बिन कुछ कहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. मी एक पायलट असलो तरी अभिनयच माझे खरे क्षेत्र आहे असे मला वाटते. 

Web Title: Do you know that something Fame Nikhil Sabarwal is in real life pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.