​बरखाला इंद्रनेलने दिले हे दिवाळी गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:24 IST2016-10-27T16:24:04+5:302016-10-27T16:24:04+5:30

बरखा बिष्ट सध्या नामकरण या मालिकेत प्रमुख भूमिकेत असल्याने तिला तिचा जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणासाठी द्यावा लागतो. कुटुंबासाठी ...

Diwali gift given to Indranell Barkhaa | ​बरखाला इंद्रनेलने दिले हे दिवाळी गिफ्ट

​बरखाला इंद्रनेलने दिले हे दिवाळी गिफ्ट

खा बिष्ट सध्या नामकरण या मालिकेत प्रमुख भूमिकेत असल्याने तिला तिचा जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणासाठी द्यावा लागतो. कुटुंबासाठी तर सोडा पण तिला स्वतःसाठीदेखील वेळ मिळत नाही. बरखा महिन्यातील जास्तीत जास्त दिवस चित्रीकरण करत असल्याने बरखाची तब्येत नुकतीच बिघडली होती. तिला मालिकेच्या सेटवर चक्करदेखील आली होती. त्यामुळे या सततच्या चित्रीकरणातून तिने नुकतीच एक दिवसाची सुट्टी घेतली होती. या सुट्टीचा तिने सदुपयोग केला. या सुट्टीत तिने संपूर्ण दिवस तिच्या पतीसोबत घालवला. बरखाचे लग्न अभिनेता इंद्रनेल सेनगुप्ता सोबत झालेले आहे. इंद्रनेलनेदेखील आपल्या पत्नीला वेळ देण्यासाठी चित्रीकरणातून सुट्टी घेतली होती. इंद्रनेल एक चांगल्या नवऱ्याप्रमाणे नेहमीच आपल्या पत्नीची काळजी घेतो. तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर बरखाची हिऱ्याची अंगठी हरवली होती. ती अंगठी तिला इंद्रनेलने गिफ्ट दिल्यामुळे ती अंगठी हरवल्यानंतर तिला खूप वाईट वाटले होते. टीममधील लोकांच्या मदतीने तिने ती अंगठी शोधण्याचा प्रयत्नदेखील केला होता. पण अनेक तास शोधूनदेखील तिला अंगठी मिळाली नव्हती. बहुधा याच कारणामुळे सुट्टीच्या दिवशी इंद्रनेल बरखाला दागिन्यांच्या दुकानात घेऊन गेला आणि तिच्या आवडचे दागिने तिला घेऊन दिले. तिला काही सोन्याचे दागिने आणि हिऱ्याची अंगठी त्याने घेऊन दिली. दिवाळीला इंद्रनेलने इतके चांगले गिफ्ट दिल्यामुळे ती सध्या चांगलीच खूश आहे. बरखाने तिच्यासोबतच घरातील सगळ्यांसाठी शॉपिंग केली. तिने तिच्या मुलीला आणि सासूलाही सोन्याची भेटवस्तू घेतली. 

Web Title: Diwali gift given to Indranell Barkhaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.