वैशाली टक्करचे बच्चेकंपनीसह दिवाळी सेलिब्रेशन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:53 IST2016-10-27T16:53:39+5:302016-10-27T16:53:39+5:30
'ससुराल सिमर' , ये रिश्ता क्या कहलाता है अशा मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वैशाली टक्करला आपण सा-यांनी पाहिले आहे. एक ...
.jpg)
वैशाली टक्करचे बच्चेकंपनीसह दिवाळी सेलिब्रेशन !
' ;ससुराल सिमर' , ये रिश्ता क्या कहलाता है अशा मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वैशाली टक्करला आपण सा-यांनी पाहिले आहे. एक अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली वैशाली टक्कर तिच्या खाजगी आयुष्यातही तितकीच खास आहे. सध्या सा-या कलाकारांप्रमाणेच ती दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन करताना दिसतेय. मात्र हे सेलिब्रेशन थोडे खास आणि हटके आहे. फटाके वाजवणे, चांगले नवीन कपडे खरेदी करणे,घरात बनवलेल्या फराळावर ताव मारणे असा सर्वसाधारण मजा मस्ती करण्याचा प्रत्येकाचाच प्लॅन असतो. सर्वसामान्यांप्रमाणे वैशालीचा असाच काहीसा प्लॅन आसावा असे कदाचित तुम्हाआहाला वाटेल. मात्र तिचे नेहमी दिवाळी सेलिब्रेशन थोडा स्पेशल असते. यंदाही तिचे दिवाळी सेलिब्रेशन खास आहे. सध्या वैशालीने रस्त्यांवर राहणा-या चिमुकल्यांबरोबर दिवाळीचा आनंद लुटताना दिसतेय. या मुलांना भेटून तिने त्यांना फराळ, कपडे भेट म्हणून दिलेत. याविषयी वैशाली सांगते, लहानपणापासूनच मी दिवाळीत तिचे कपडे, फराळ घेवून या मुलांना देते. त्यांच्याबरोबर मजा मस्ती करते. त्यांच्याबरोबर काही वेळ मजा करताना मिळालेला आनंदही कोणत्याच गोष्टींतून मिळवता येणार नाही असाच असतो. माझे कुटुंबही मला या गोष्टीसाठी नेहमी पाठिंबा देतात. त्यामुळेच दिवाळीचे सुरुवातीला मी रस्त्यांवर राहणा-या मुलांना भेटून दिवाळी सेलिब्रेट करत असल्याचे तीन सांगितले.यंदाही अंधेरीतील डी.एन.नगर परिसरात जाऊन या मुलांबरोबर दिवाळीची मजा मस्ती केली. इतकचे नाही तर या चिमुकल्यांबरोबर सेल्फी काढत तिने सा-यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. जसे जमेल तसे सगळ्यांनी आपापल्या परीने दुस-यांच्या आयुष्यात दोन क्षण का होई ना आनंदाचे निर्माण करण्यात हरकत नाही. नेहमी जमेल तशी मदत करा यातून मिळणार दुसरा आनंद कोणताच नाही असा सल्ला तिने तिच्या चाहत्यांना दिला आहे.
![]()