छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध जोडप्याने दाखल केला घटस्फोटचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 12:16 IST2017-12-29T06:46:36+5:302017-12-29T12:16:36+5:30

जुही परमार आणि सचिन श्रॉफ हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शो मध्ये ...

Divorce application filed by this famous couple on small screens | छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध जोडप्याने दाखल केला घटस्फोटचा अर्ज

छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध जोडप्याने दाखल केला घटस्फोटचा अर्ज

ही परमार आणि सचिन श्रॉफ हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शो मध्ये देखील हजेरी लावली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. पण आता ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. ते घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून येत होत्या. पण आता त्यांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला असल्याचे म्हटले जात आहे. ते परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहेत. जुही आणि सचिन यांना चार वर्षांची समायरा ही मुलगी असून ती सध्या जुहीसोबत राहाते. तिची कस्टडी जुहीकडेच राहाणार असल्याची चर्चा आहे. 
जुही परमारला प्रेक्षक कुमकुम म्हणूनच ओळखतात. कुमकुम प्यारा सा बंधन या मालिकेत तिने साकारलेली कुमकुमची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच काही वर्षांपूर्वी ती बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती. बिग बॉसचे विजेतेपद देखील तिने मिळवले होते. २००९ मध्ये तिने सचिन श्रॉफ सोबत लग्न केले होते. सचिन हा व्यवसायिक असण्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता देखील आहे. त्याने सिंदूर तेरे नाम का, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

juhi parmar sachin shroff


सचिन आणि जुहीच्या लग्नाला आठ वर्षं झाले असून आता ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ते दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहात आहेत. जुही आणि सचिनच्या लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते. सुरुवातीच्या काळात त्या दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.
सचिन गेल्या कित्येक दिवसांपासून जुहीसोबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीये. कर्मपाल दाता शनी या कार्यक्रमाच्या लाँचिंगच्या प्रसंगी देखील सचिन अनुपस्थित राहिला होता. एवढेच नव्हे तर जुहीच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला जुही नेहमीच तिच्या मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. पण या फोटोंमध्ये सचिन कधीच दिसत नाही. 

 

Web Title: Divorce application filed by this famous couple on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.