"या निमित्ताने कानावर पडून.." हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- "अमराठी माणसाशी.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 4, 2025 14:04 IST2025-07-04T14:03:45+5:302025-07-04T14:04:48+5:30
महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी लिहिलेली रोखठोक पोस्ट चर्चेत आहे. मोजक्या शब्दात गोस्वामींनी महत्वाची गोष्ट मांडली आहे

"या निमित्ताने कानावर पडून.." हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- "अमराठी माणसाशी.."
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे कायम आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घटनांबद्दल पोस्ट लिहित असतात. सचिन गोस्वामींची बिनधास्त - रोखठोक भूमिका अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. सचिन गोस्वामींची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी भाषा टिकण्याविषयी छोटीशी तरीही महत्वाची पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले सचिन गोस्वामी? जाणून घ्या
सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत
सचिन गोस्वामींनी फेसबुकवर एक छोटीशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, "आपण अमराठी माणसाशी आग्रहाने मराठीच बोलू या..या निमित्ताने कानावर पडून पडून ते ही बोलू लागतील.. मराठी भाषा व्यवहाराची झाली तरच टिकेल..सुरुवातआपणच केली पाहिजे." अशाप्रकारे सचिन गोस्वामींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. गोस्वामींच्या अनेक चाहत्यांनी आणि सोशल मीडिया यूजर्सने या पोस्टला समर्थन दिलं आहे.
सचिन गोस्वामींचं वर्कफ्रंट
सचिन गोस्वामींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतंच त्यांचं लेखन-दिग्दर्शन असलेला 'गुलकंद' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे हे कलाकार झळकले होते. या सिनेमाचं खूप ठिकाणी कौतुक झालं. इतकंच नव्हे तर प्रेक्षक-समीक्षकांनाही हा सिनेमा खूप आवडला. सचिन गोस्वामींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. याशिवाय गेली पाचहून जास्त वर्ष गोस्वामी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं दिग्दर्शन करत आहेत.