बॉलिवूडमधील स्टंट दिग्दर्शक अलान अमीन करणार या मालिकेचे अ‍ॅक्शनप्रसंगांचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:50 IST2017-02-27T08:20:55+5:302017-02-27T13:50:55+5:30

सिनेमातील एक्शनचा प्रभाव आता मालिकांमध्येही पाहायला मिळतोय. नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने काम करण्याचा कल असणारा-या मालिका आता एक्शनकडेही वळताना पाहायला ...

Directed by Alyan Amin, stunt director of Bollywood, the action sequel to the series | बॉलिवूडमधील स्टंट दिग्दर्शक अलान अमीन करणार या मालिकेचे अ‍ॅक्शनप्रसंगांचे दिग्दर्शन

बॉलिवूडमधील स्टंट दिग्दर्शक अलान अमीन करणार या मालिकेचे अ‍ॅक्शनप्रसंगांचे दिग्दर्शन

नेमातील एक्शनचा प्रभाव आता मालिकांमध्येही पाहायला मिळतोय. नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने काम करण्याचा कल असणारा-या मालिका आता एक्शनकडेही वळताना पाहायला मिळतायेत. विशेष म्हणजे ज्या मालिकांमध्ये जास्तीत जास्त एक्शन सीन्स पाहायला मिळतात. त्या मालिकांना रसिकांची जास्त पसंती मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळ सिनेमाचे एक्शन डिरेक्टर आता छोट्या पडद्यावरील मालिकांचेही एक्शन सीन्सचे दिग्दर्शन करताना दिसतात.‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेतील अ‍ॅक्शन प्रसंगांच्या दिग्दर्शनासाठी बॉलिवूडमधील स्टंट दिग्दर्शक अलान अमीन यांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतील अ‍ॅक्शनप्रसंग हे चित्रपटातील अ‍ॅक्शनप्रसंगांइतके थरारक असावेत आणि त्यामुळे मालिकेची प्रेक्षणीयता वाढावी, हा त्यामागील उद्देश आहे.‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ ही मालिका या वाहिनीवरील आजवरची सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी

मालिका ठरणार आहे. त्यामुळे या मालिकेचा दर्जा सर्वोच्च राखण्यासाठी निर्मात्यांनी सर्वोत्कृष्ट कलाकार आणि कर्मचारी यांची निवड केली आहे. मालिकेतील दोन प्रमुख कलाकार आकाशदीप सेहगल आणि शालीन भानोत यांच्यातील एका जोरदार युध्दप्रसंगाचे- जो मालिकेचा प्रारंभीचा प्रसंग आहे- चित्रीकरण नुकतेच करण्यात आले असून त्यात हे दोन कलाकार घोड्य़ावर बसून तलवारयुध्द खेळताना दाखविण्यात आले आहे.या प्रसंगाबद्दल अलान अमीन म्हणाले, “या मालिकेतील युध्दप्रसंगांचे दिग्दर्शन मी करणार आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या युध्दप्रसंगाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून तो अत्यंत कौशल्याचा आणि भव्य प्रसंग आहे. तो प्रसंग पाहताना आपण चित्रपटातील प्रसंग पाहात असल्यासारखं प्रेक्षकांना वाटेल.मालिकेच्या निर्मात्यांनी मला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य केलं असून हे अ‍ॅक्शनप्रसंग माझ्या मनासारखे चित्रीत करण्यास मुक्त वाव दिला आहे. ते पाहताना प्रेक्षकांना नक्कीच थरारकतेचा अनुभव येईल.”

Web Title: Directed by Alyan Amin, stunt director of Bollywood, the action sequel to the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.