'माझ्या नव-याची बायको' फेम श्वेता मेहंदळेचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:56 IST2018-03-22T09:56:14+5:302018-03-22T15:56:53+5:30

अभिनेत्री श्वेता मेंहदळे नावावरुन कोण ही असा प्रश्न तुम्हाला पडेल.मात्र 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी श्वेता ...

Did you see this photo of Fame Shweta Mehndale, 'My New Wife's Wife'? | 'माझ्या नव-याची बायको' फेम श्वेता मेहंदळेचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

'माझ्या नव-याची बायको' फेम श्वेता मेहंदळेचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

िनेत्री श्वेता मेंहदळे नावावरुन कोण ही असा प्रश्न तुम्हाला पडेल.मात्र 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी श्वेता हे नाव काही नवीन नाही.या मालिकेत पुरुषांबद्दल प्रचंड चीड असणारी आणि राधिकाच्या कठीण प्रसंगी खांद्याला खांदा भिडवून राहणारी रेवती म्हणजेच श्वेता.या मालिकेत नेहमीच कुर्ता किंवा साडीमध्ये श्वेता पाहायला मिळते. मात्र गुप्तेसह तिने आता दुसरं वैवाहिक जीवन सुरु केलं आहे.त्यामुळे गुप्ते रेवतीचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतो. गुप्ते म्हणजेच आपल्या पतीच्या आग्रहाखातर रेवती शॉर्ट वनपीस परिधान करते. यांत शनायापेक्षा सुंदर दिसत असल्याची कमेंट  रेवतीच्या लेकीकडून मिळते. मात्र रिअल लाइफमध्येही रेवती अर्थात श्वेता तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.रिअल लाइफमध्ये श्वेता मॉर्डन रहायला आवडतं.श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच मादक आणि सेक्सी आहेत.या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर श्वेताने शेअर केलेत. तिचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 

रिअल लाईमध्ये श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे.'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते.या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे.'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.

दिवसेंदिवस ‘माझ्या नव-याची बायको’मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे शनाया या व्यक्तीरेखेचा.अभिनेत्री रसिका सुनील हिनं ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकानं मोठ्या खुबीनं रंगवली आहे.फक्त पैस्यांच्या लोभापोटी शनाया गुरूनाथ (अभिजीत खांडेकर)ला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत असते. तसेच गॅरीही पत्नी राधिकाला ( अनिता दाते) सोडून शनायाच्या मागे असतो.मात्र या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.'माझ्या नवऱ्याची बायको'चे कन्नड व्हर्जन मालिकेत 'गॅरी' ही भूमिका गुरुमुर्ती भवानी सिंग हा अभिनेता साकारत आहे.

Web Title: Did you see this photo of Fame Shweta Mehndale, 'My New Wife's Wife'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.