फूल और काटे फेम मधू शहाचा नवा लूक पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 14:02 IST2017-07-08T08:32:53+5:302017-07-08T14:02:53+5:30
फूल और काटे या चित्रपटात अजय देवगण आणि मधू झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली ...
फूल और काटे फेम मधू शहाचा नवा लूक पाहिला का?
फ ल और काटे या चित्रपटात अजय देवगण आणि मधू झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली होती. नव्वदीच्या दशकात तिचे अनेक चित्रपट गाजले होते. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये तिने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केले नव्हते. मात्र ती आजही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजत देखील आहेत. अनेक वर्षं मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर मधू आता छोट्या पडद्याकडे वळली आहे. ती आरंभ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती एका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सध्या या भूमिकेसाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेतील तिचा लूक देखील खूप वेगळा असणार आहे.
आरंभ या मालिकेची घोषणा झाल्यापासून या मालिकेची चांगलीच चर्चा आहे. या मालिकेची कथा ही के.व्ही.विजयेंद्र प्रसाद यांची असून या मालिकेचे दिग्दर्शन गोल्डी बहेल करत आहे. या मालिकेत अनेक बॉलिवूडमधील चेहेरे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत तनुजा मुखर्जी, तेज सप्रू, रजनीश दुग्गल, मधू शहा यांसारखे प्रसिद्ध कलाकार आहेत.
मधू या मालिकेत संभाविज ही भूमिका साकारत आहे. ती अतिशय सुंदर पण त्यातही काहीशी कणखर दिसावी यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. या मालिकेत ती भडक कपड्यात दिसणार आहे. तसेच तिच्या नाकात नथ, पायात पैंजण असणार आहे. तसेच ती जड दागदागिने आणि मुकूट घालणार आहे. या भूमिकेविषयी मधू सांगते, या माझ्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. ही भूमिका अतिशय सशक्त असून अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यांदाच साकारत आहे. माझा लूकदेखील खूप छान आहे. मी मालिकेत वापरत असलेले सगळे दागिने हे सोन्याचे आहेत. सगळेच दागिने अतिशय सुरेख आहे. यातील काही दागिने माझे स्वतःचे देखील आहेत. मी माझ्या लग्नात घातलेले दागिने या मालिकेत वापरत आहे. तसेच या मालिकेत मी राणीची भूमिका साकारत असल्याने या गेटअपमध्ये माझ्या डोक्यावर मुकूट देखील असणार आहे. या मुकूटाचे वजन हे जवळजवळ सात किलो आहे. तसेच माझ्या हातात सतत एक तलवारदेखील असणार आहे. या तलवारीवर खूप छान कलाकुसर करण्यात आलेली आहे. मालिकेची आठवण म्हणून मालिका संपल्यावर ही तलवार माझ्याकडे ठेवायची असे मी ठरवले आहे.
Also Read : फूल और काटे फेम मधू आरंभ या मालिकेत