​करिश्मा शर्माचे हॉट बिकिनी फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:26 IST2017-03-30T07:32:38+5:302017-03-30T13:26:01+5:30

करिश्मा शर्माने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर प्यार तुने क्या किया, सिलसिला प्यार का यांसारख्या ...

Did you see Karisma Sharma's hot bikini photo? | ​करिश्मा शर्माचे हॉट बिकिनी फोटो तुम्ही पाहिले का?

​करिश्मा शर्माचे हॉट बिकिनी फोटो तुम्ही पाहिले का?

िश्मा शर्माने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर प्यार तुने क्या किया, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ये है मोहोब्बते या मालिकेत ती सध्या साकारत असलेली रैना ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तिने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. प्यार का पंचनामा 2 या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. 

Karishma Sharma
करिश्मा ही सोशल नेटवर्किंगवर खूपच अॅक्टिव्ह असते. करिश्माला फिरायला खूप आवडत असल्याने ती चित्रीकरणातून वेळ काढून नेहमी कुठे ना कुठे फिरायला जात असते आणि तिथले फोटो तिच्या सोशल नेटवर्किंग साइटवर टाकत असते आणि त्यातही करिश्मा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अधिकाधिक हॉट फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटला हजारोहूनही अधिक फोलोव्हर्स आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तर करिश्मा तिचे खूपच हॉट फोटो पोस्ट करत असल्याने तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. तिने नुकतेच तिचे काही बिकिनीमधील फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केले आहेत. या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकांनी यावर कमेंटदेखील केल्या आहेत. 
करिश्मा गेली अनेक वर्षं मालिकांमध्ये काम करत आहे. पण आघाडीच्या नायिकांच्या यादीत तिला आपले नाव बनवता आले नाही. पण या तिच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमुळे ती आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षाही खूप चर्चेत आहे.
चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्यासोबतच करिश्मा लाइफ सही है या वेबसिरिजमध्ये झळकली होती. यात तिने एका नोकराणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती.  

Karishma Sharma


 

Web Title: Did you see Karisma Sharma's hot bikini photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.