Hruta Durgule : लग्नानंतर ह्रता दुर्गुळेचा पहिला फोटो आला समोर, पतीला म्हणाली- 'लेट्स गो...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:48 PM2022-05-20T17:48:13+5:302022-05-20T17:52:04+5:30

दुर्वा' होऊन 'फुलपाखरु'सारखी मराठी कलाविश्वात स्वच्छंदपणे वावरणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेने (hruta durgule) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

Did you see Hruta Durgule first pic after marriage | Hruta Durgule : लग्नानंतर ह्रता दुर्गुळेचा पहिला फोटो आला समोर, पतीला म्हणाली- 'लेट्स गो...'

Hruta Durgule : लग्नानंतर ह्रता दुर्गुळेचा पहिला फोटो आला समोर, पतीला म्हणाली- 'लेट्स गो...'

googlenewsNext

'दुर्वा' होऊन 'फुलपाखरु'सारखी मराठी कलाविश्वात स्वच्छंदपणे वावरणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेने (hruta durgule) नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत हृताने सप्तपदी घेत नव्या जीवनाला सुरुवात केली आहे. ह्रताने 18 मे रोजी प्रतिक शहासोबत  गुपचूप लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या लग्नसोहळ्याला मराठी तसेच हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. आता लग्नानंतर ह्रता आणि प्रतिक हनीमूनला निघालेत. ह्रताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट केला आहे. 

ह्रताने सोशल मीडियावर एअरपोर्टवरचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यावर तिने 'लेस्ट गो प्रतिक शाह' असं म्हणत तिने त्याला टॅग केलं आहे. ह्रताने शेअर केलेला हा फोटो मुंबई एअर पोर्टवरचा असल्याचे फोटोच्या बॅकग्राऊंडवरून लगेच लक्षात येतं. प्रतिकच्या हातात सामानची ट्रोली आहे. या फोटोवरून दोघे हनीमूनला निघल्याचं समजतंय.पण नेमकं हनीमूनला दोघे कुठे चालेत यांचा त्यांनी काही उल्लेख केला नाही. ह्रताने शेअर केलेल्या फोटो तिच्या चेहऱ्यावर आलेला लग्नाचा ग्लो नक्की दिसतोय. 

हृता दुर्गुळे हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिचा आणि प्रतीक शाहचा फोटो शेअर करून रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यांनतर २४ डिसेंबर २०२१ ला या दोघांनी साखरपुडा केला होता. हे दोघे लग्न कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांनी गुपचूप लग्न करत सर्वाना सुखद धक्का दिला आहे.

प्रतीक शाह हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.


 

Web Title: Did you see Hruta Durgule first pic after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.