अभिनेता शशांक केतकरच्या पत्नीला पाहिलंत का?, तिने नुकताच सुरू केला नवा बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 07:00 IST2021-08-20T07:00:00+5:302021-08-20T07:00:00+5:30
अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.

अभिनेता शशांक केतकरच्या पत्नीला पाहिलंत का?, तिने नुकताच सुरू केला नवा बिझनेस
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. शशांक होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरात पोहचला आहे. शशांकने २०१७ साली प्रियांकासोबत लग्न केले. प्रियांकाने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात शशांक आणि प्रियांकाला पुत्ररत्न प्राप्ती झाली. शशांकने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद ठेवले आहे, याबाबत त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे.
अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आजच तिने सोशल मीडियावरून या नव्या व्यवसायाची बातमी दिली आहे. शशांक केतकर अभिनयासोबतच आईच्या गावात या नावाने पुण्यातील कोथरूड परिसरात एक हॉटेल देखील चालवत होता. या हॉटेलची जबाबदारी शशांकच्या अनुपस्थितीत त्याची आई, वडील आणि पत्नी प्रियांका सांभाळत होती. मात्र २०१९ साली काही कारणास्तव शशांकने हे हॉटेल बंद करत असल्याचे जाहीर केले होते. शशांक हॉटेल बंद करतोय असे म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी हॉटेल बंद करू नकोस अशा सूचना दिल्या होत्या. मात्र यापुढे हे हॉटेल चालवणे त्याला शक्य नसल्याचे त्याने सांगितले होते.
मुलाच्या जन्मानंतर आता साधारण सहा महिन्यांनी प्रियांकाने स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी नुकताच नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले होते.
रेनबो ट्विंकल्स या नावाने तिने स्वतःचे आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे. प्रियांकासह शशांकने ही आनंदाची बातमी नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली असून आमच्या या नव्या व्यवसायाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज असल्याचे म्हटले आहे.
शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो पाहिले न मी तुला या मालिकेत काम करतो आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिकेचे शूटिंग देखील पूर्ण झाले असल्याने लवकरच तो आता एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.