​कोणी केले बोमन इराणीला प्रपोज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:55 IST2017-03-30T08:25:27+5:302017-03-30T13:55:27+5:30

बोमन इराणी यांनी डरना मना हे, बूम यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात त्यांनी ...

Did anyone propagate Boman Irani? | ​कोणी केले बोमन इराणीला प्रपोज?

​कोणी केले बोमन इराणीला प्रपोज?

मन इराणी यांनी डरना मना हे, बूम यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉ.अस्थाना ही भूमिका प्रचंड गाजली होती. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. त्यानंतर ते नो एंट्री, वक्त, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या अनेक चित्रपटात झळकले. 
बोमन आज मोठ्या पडद्यावरचे एक महत्त्वाचे नाव बनले आहे. आज त्यांच्या नावावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात. त्यांनी केवळ साहाय्यक अभिनेता म्हणून नव्हे तर अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक हास्यकलाकार, खलनायक अशा विविध भूमिकांमध्ये ते आतापर्यंत झळकले आहेत. बोमन इराणी यांचे फॅन फॉलॉविंग मोठ्या प्रमाणावर आहे. 
बोनम यांचे फॅन्स सगळ्याच वयोगटातील आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत त्यांचे अनेक फॅन्स आहेत. अर्शद वारसी आणि रवीना टंडन यांच्यासोबत ते सध्या सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका बजावत आहेत. या कार्यक्रमात अनेक लहान मुले आपली कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळेच स्पर्धक एकाहून एक टायलेंटेड आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर बोमन यांना त्यांच्या एका क्युट चाहत्याला भेटण्याची संधी मिळाली.
पर्ल या कार्यक्रमात एक स्पर्धक आहे. त्याची आजी बोमन यांची खूप मोठी फॅन आहे. तिने बोमन यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिले होते. हे पत्र वाचून बोमन प्रचंड भारावून गेले होते. या पत्रात पर्लच्या आजीने त्यांचे बोमन यांच्यावर असलेले प्रेम खूप सुंदर शब्दांत व्यक्त केले होते. त्याचसोबत पर्लच्या आजीने बोमन यांच्यासोबत अनारकली डिस्को चली या गाण्यावर डान्सदेखील केला. 

Web Title: Did anyone propagate Boman Irani?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.