Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:32 IST2025-08-15T17:31:54+5:302025-08-15T17:32:21+5:30

२००८ मध्ये 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणारा बालकृष्ण आठवतोय का? या बालकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.

Dhriti Bhatia Played little Krishna Role In Jai Shri Krishna Serial, Huge Transformation In Her Look | Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

टेलिव्हिजनवर बऱ्याच बालकलाकारांनी बाळ कृष्णाची भूमिका साकारली आहे. काही बालकलाकारांनी कृष्णाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यातील काही चिमुकले कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशीच २००८ मध्ये प्रसारीत झालेली मालिका 'जय श्री कृष्णा'(Jai Shri Krishna Serial)मध्ये भगवान कृष्णाची भूमिका धृती भाटिया (Dhriti Bhatia) हिने साकारली होती. आता ती जवळपास १९ वर्षांची आहे. जेव्हा तिने कृष्णाची भूमिका साकारली तेव्हा ती फक्त अडीच वर्षांची होती. या मालिकेतून तिचे फॅन फॉलोइंग खूप वाढले. बरेच लोक तिला खरा कृष्ण मानू लागले होते.  

धृतीने 'जय श्री कृष्ण' मालिकेत भगवान बालपणीच्या कृष्णाची भूमिका साकारली होती. मोठे केस व चेहऱ्यावरील निरागता व स्मितहास्यामुळे प्रेक्षकांची आवडती बालकृष्ण बनली. धृतीने ज्यावेळी ही भूमिका साकारली तेव्हा ती फक्त अडीच वर्षांची होती. ही मालिका रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांनी बनवली होती. या मालिकेनंतर धृती बऱ्याच मालिकेत झळकली. ती बरूण सोबतीसोबत 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'माता की चौकी' या मालिकेत झळकली होती. 


धृती आता १९ वर्षांची झाली असून तिच्यात आता खूप मोठा बदल झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आताही कायम आहे. पण आता तिला ओळखणं कठीण झालं आहे. सध्या तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. धृतीचे वडील गगन भाटिया एक व्यावसायिक आहेत आणि आई पूनम एक अभिनेत्रीसोबतच कोरिओग्राफर देखील आहेत. तिला तिच्या आईप्रमाणेच कोरिओग्राफर बनायचं असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Web Title: Dhriti Bhatia Played little Krishna Role In Jai Shri Krishna Serial, Huge Transformation In Her Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.