‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच ढिंचॅक पूजाला मिळाला ‘हा’ शो, महिन्याकाठी कमाविते लाखो रूपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 19:44 IST2017-11-16T14:14:50+5:302017-11-16T19:44:50+5:30
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये वाइल्ड कार्डच्या माध्यमातून एंट्री करणाºया ढिंचॅक पूजाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. होय, रिपोर्ट्सनुसार ...
.jpg)
‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच ढिंचॅक पूजाला मिळाला ‘हा’ शो, महिन्याकाठी कमाविते लाखो रूपये!
ब ग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये वाइल्ड कार्डच्या माध्यमातून एंट्री करणाºया ढिंचॅक पूजाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. होय, रिपोर्ट्सनुसार ढिंचॅक पूजा लवकरच ‘एंटरटेनमेंट की रात’ या नव्या शोमध्ये बघावयास मिळणार आहे. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये दोन नव्या पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. दोघे रॅपच्या माध्यमातून एकमेकांविषयी तक्रार करताना अन् एकमेकांची खिल्ली उडविताना बघावयास मिळणार आहे. अखेरीस जो माइक सोडणार त्याचा शोमध्ये पराभव होईल. वृत्तानुसार या शोमध्ये दीपिका कक्कड, मौनी रॉय, आदित्य नारायण आणि रवि दुबे दिसणार आहेत. शोच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या या शोचे टिजर रिलीज करण्यात आले असून, त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिल्लीत राहणारी ढिंचॅक पूजा ऊर्फ पूजा जैन (२३) हिचा जन्म उत्तर प्रदेश येथे झाला. पूजाने रोहतक येथील मॉडेल स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या ती गुरुगोविंद सिंग इंद्रप्रस्थ युनिर्व्हसिटीमध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत आहे. नुकतेच तिचे ‘आफरीन तो बेवफा’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्यामुळे पूजा सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण हे गाणे अपलोड करताच तेरा तासांत तब्बल ६० हजारांपेक्षा अधिक लोकांनी ते बघितले आहे.
उपलब्ध माहितीनुसार पूजा एक महिन्यात तीन लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत कमाई करते. पूजा एक यू-ट्यूबवर असून, तिचे गाणे जेव्हा-जेव्हा क्लिक केले जातात, त्याचा फायदा पूजाला होतो. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खानसोबत तिने बेड शेअर केल्याने तिची सर्वत्र खिल्ली उडविण्यात आली होती. घरातील काही सदस्यांनी तर तिच्या या प्रतापामुळे तिच्यापासून दूर राहणे पसंत केले. दरम्यान, पूजा या नव्या शोमध्ये येत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ती या शोवर काय कारनामा करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.