​दिया और बाती हम फेम अनस रशिद अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 14:20 IST2017-03-30T08:50:23+5:302017-03-30T14:20:23+5:30

दिया और बाती हम ही मालिका संपल्यानंतर आता या मालिकेत सुरजची भूमिका साकारणाऱ्या अनस रशिदला त्याचे फॅन्स चांगलेच मिस ...

Dey and Baati, we are going to marry Fame Anas Rashid | ​दिया और बाती हम फेम अनस रशिद अडकणार विवाहबंधनात

​दिया और बाती हम फेम अनस रशिद अडकणार विवाहबंधनात

या और बाती हम ही मालिका संपल्यानंतर आता या मालिकेत सुरजची भूमिका साकारणाऱ्या अनस रशिदला त्याचे फॅन्स चांगलेच मिस करत आहेत. अनस कोणत्या मालिकेत झळकणार याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. अनस सध्या चित्रीकरणामध्ये व्यग्र नसल्याने त्याचा सगळा वेळ त्याने कुटुंबीयांना देण्याचे ठरवले आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नासाठी मुली पाहात आहे आणि आता त्याने लग्न करण्याचा विचार केला आहे.
अनस आता लवकरच आयुष्यात सेटल होणार आहे. अनस लव्ह मॅरेज नव्हे तर अरेंज मॅरेज करत आहे. त्याच्या पालकांनी त्यांच्यासाठी एक मुलगी निवडली आहे आणि ही मुलगी अनसलादेखील आवडल्याने त्याने लग्न करण्याचे ठरवले आहे आणि ही बातमी त्याने स्वतः त्याच्या फॅन्सना दिली आहे. अनस सध्या 38 वर्षांचा असून तो त्याच्यापेक्षा वयाने 14 वर्षं लहान असलेल्या मुलीसोबत लग्न करत आहे. त्याच्यासाठी मुलीची निवड त्याच्या आईनेच केली असून या मुलीचे नाव हिना आहे. हिना ही केवळ 24 वर्षांची आहे. हिना ही गेल्या सहा वर्षांपासून चंडिगडमध्ये राहात आहे. अनस आणि हिना यांचा साखरपुडा लवकरच होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली असली तरी त्यांनी लग्न कधी करायचे याबाबत अद्याप तरी विचार केलेला नाही. 
अनसच्या आईने हिना आणि अनस यांची भेट घडवून आणली होती. ते दोघे केवळ काहीच दिवसांपूर्वी भेटले असून पहिल्याच भेटीत अनसला हिना आवडली आणि त्याने लगेचच लग्नासाठी होकार कळवला. 
हिना ही अनसच्या क्षेत्रातील नसून ती कॉर्पोरेट जगतातील आहे. चंडिगडमधील एका कंपनीत ती एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करते. हिनाच्या घरातील सगळेच दिया और बाती हम या मालिकेचे फॅन आहेत. त्यांना सगळ्यांनाच सुरजची व्यक्तिरेखा खूप आवडत होती. हिनाच्या आईला तर नेहमीच सुरजसारखा जावई हवा होता. अनस आणि हिना सध्या लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  

Web Title: Dey and Baati, we are going to marry Fame Anas Rashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.