देवमाणूस पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:27 IST2022-10-10T19:26:19+5:302022-10-10T19:27:00+5:30
Kiran Gaikwad : 'देवमाणूस' मालिकेतील डॉ. अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड चर्चेत आला आहे.

देवमाणूस पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?, व्हिडीओ होतोय व्हायरल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील पात्रदेखील खूप चर्चेत आली होती. या मालिकेमध्ये डॉक्टर अजित कुमार देव अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील डॉ. अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) चर्चेत येत असतो. दरम्यान आता तो प्रेमात पडल्याची सर्वत्र चर्चा होते आहे.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेत किरण गायकवाडने भैय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळाले होते. या मालिकेतील किरणची सहकलाकार पूर्वा शिंदे हिच्यासोबत त्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लागीरं झालं जी मालिकेत दोघेही नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. पण सध्या त्यांच्या या रोमॅन्टिक व्हिडिओची जोरात चर्चा सुरू आहे.
एकूणच काय तर किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे आता एकमेकांच्या प्रेमात पडले की काय अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.