​दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लवकरच करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 17:05 IST2017-11-20T11:34:37+5:302017-11-20T17:05:54+5:30

दिपिका कक्कर अनेक वर्षं ससुराल सिमर का या मालिकेत काम करत होती. या मालिकेत शोएब इब्राहिम तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत ...

Deepika Kakkar and Shoaib Ibrahim will soon be married | ​दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लवकरच करणार लग्न

​दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लवकरच करणार लग्न

पिका कक्कर अनेक वर्षं ससुराल सिमर का या मालिकेत काम करत होती. या मालिकेत शोएब इब्राहिम तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकत होता. या मालिकेच्या सेटवरच शोएब आणि दिपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपल्या नात्याची कबुली अनेकवेळा मीडियासमोर दिली असून शोएबने मीडियासमोर दिपिकाशी लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. ससुराल सिमर का या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाचे लग्न झालेले होते. मात्र काही कारणास्तव तिचे लग्न तुटले... त्यानंतर तिच्या कठीण काळात शोएबने तिला आधार दिला आणि तिची मदत केली. दुसरीकडे शोएबच्या पडत्या काळात दीपिकाने त्याला साथ दिली. त्याच्या पाठिशी ठामपणे ती उभी राहिली. मात्र तोवर एकमेकांना ते प्रेमात असल्याचे जाणवले नव्हते. मात्र शोएबने ससुराल सिमर का ही मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवू लागली. या काळात दिपिका फार खचून गेली होती. त्यानंतर मात्र दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या तीन-साडे तीन वर्षांपासून ते एकमेंकांना डेट करत आहेत. आता ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 
दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने नच बलिये या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर आता ते दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. दोघांना अनेक वेळा त्यांच्या लग्नाबाबत विचारले जाते. हा प्रश्न नुकताच दिपिकाला एका मुलाखतीच्या दरम्यान विचारला असता तिने सांगितले, मला या प्रश्नाबाबत नेहमीच सगळे विचारतात. हो, आम्ही लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहोत. आम्ही याविषयी सगळ्यांना लवकरच सांगणार आहोत. आमच्या आयुष्यात आमचे फॅन्स हे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना आम्ही लग्नाबाबत सगळ्यात पहिल्यांदा सांगायचे असे ठरवले आहे. 
कोई लौट के आया है या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. 

Also Read : शोएब इब्राहिम आणि दिपाली कक्कर झळकणार कोई लौट के आया है या मालिकेत

Web Title: Deepika Kakkar and Shoaib Ibrahim will soon be married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.