सरस्वती मालिकेमध्ये दुर्गा बनली जादुगार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:59 IST2017-11-16T11:27:15+5:302017-11-16T16:59:32+5:30

दुर्गाच्या वाड्यात येण्याने सरस्वती मालिकेला एक वेगळे वळण मिळाले आहे. विद्युल आणि भुजंग दुर्गाला आपल्या कारस्थानामध्ये नकळतपणे सामील करून ...

Dasara became a magic cover in the Saraswati series | सरस्वती मालिकेमध्ये दुर्गा बनली जादुगार !

सरस्वती मालिकेमध्ये दुर्गा बनली जादुगार !

र्गाच्या वाड्यात येण्याने सरस्वती मालिकेला एक वेगळे वळण मिळाले आहे. विद्युल आणि भुजंग दुर्गाला आपल्या कारस्थानामध्ये नकळतपणे सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भैरवकरांचा वाडा सरस्वतीच्या नावावर असून जो पर्यंत दुर्गा त्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करत नाहीत तोपर्यंत तो वाडा विद्युलच्या नावावर होऊ शकत नाही. पण,दुर्गा विद्युलच्या कारस्थानांशी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, तरीही दुर्गा विद्युलला स्वत:च्या तालावर नाचावते आहे. दुर्गाचा वाड्यातील वावर खूपच एकदम बिनधास्त आहे, त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण तयार होते. येत्या रविवारी म्हणजे १९ नोव्हेंबरला दुर्गा प्रेक्षकांना जादुगाराचे खेळ खेळताना दिसणार आहे. दुर्गाच्या बिनधास्त, मनमोकळ्या आणि बेधडक स्वभावामुळे दुर्गाकडून मनासारखा काम करून घेणे विद्युला कठीण होऊन बसले आहे. दुर्गा कशी कशी वागेल, कुठे काय बोलेल याचा काही नेम नाही. ती कुणालाच घाबरत नाही, या कारणामुळे दुर्गाला आपल्या तालावर नाचवण विद्युलसाठी कठीण झाल आहे. आता विद्युल दुर्गाला त्या कागद पत्रांवर हस्ताक्षर करण्यास मनवू शकेल कि नाही ? दुर्गा अजून कुठल्या अडचणी विद्युलसाठी निर्माण करणार आहे हे तुम्हाला मालिका बघितल्यावर कळेल.

विद्युलला दुर्गाचे हस्ताक्षर कागदपत्रांवर हवे आहेत पण अचानक वाड्यामधील सगळे पेन गायब झाले आहेत. आता यामागे नक्की कोण आहे ? दुर्गानेच ते पेन लपवले आहेत कि भुजंगचा या मागे काही डाव आहे ? दुर्गाच्या वाड्यातील काही गंमती जमती तसेच दुर्गा विद्युलला कशी स्वत:च्या तालावर नाचवत आहे हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 

Web Title: Dasara became a magic cover in the Saraswati series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.