डान्स प्लस 3 मधील स्पर्धकांमधून सलमान खान करणार आपल्या सहनर्तकाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 16:23 IST2017-07-04T10:53:52+5:302017-07-04T16:23:52+5:30

डान्स प्लस 3 हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यंदाचे डान्स प्लसचे हे तिसरे सिझन असून पहिल्या दोन ...

In the dance plus 3 competition, Salman Khan will choose his mentor | डान्स प्लस 3 मधील स्पर्धकांमधून सलमान खान करणार आपल्या सहनर्तकाची निवड

डान्स प्लस 3 मधील स्पर्धकांमधून सलमान खान करणार आपल्या सहनर्तकाची निवड

न्स प्लस 3 हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यंदाचे डान्स प्लसचे हे तिसरे सिझन असून पहिल्या दोन सिझनमध्ये अतिशय चांगले डान्सर आपल्याला पाहायला मिळाले होते. डान्स प्लस 3 मध्ये देखील स्पर्धक एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धकांना केवळ एकमेकांबरोबरच नव्हे तर रेमोच्या पथकातील कुशल नर्तकांशी देखील स्पर्धा करावी लागणार आहे. रेमोच्या या खास पथकात देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम नर्तक देखील असणार आहेत. स्पर्धकांना या कुशल नर्तकांच्या तोडीस तोड नृत्य करून रेमोवर आपला प्रभाव टाकावा लागला आहे. 
डान्स प्लस 3 या कार्यक्रमाचे बक्षीस देखील तितकेच मोठे असणार आहे. रेमो डिसुझाने सुपरस्टार सलमान खानला आपल्या तालावर नाचवण्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्यात प्रेक्षकांना आजवर सलमानचे कधीही न पाहिलेले रूप पाहायला मिळणार आहे. डान्स प्लस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धकांचे परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच आवडले होते. आताच्या सिझनमधील स्पर्धकांमधून काही स्पर्धकांना सलमान खानसोबत नृत्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. रेमोच्या आगामी चित्रपटाची सध्या जुळवाजुळव सुरू असून सलमान खाननेही रेमोच्या सहकाऱ्यांसोबत नृत्याचे परीक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. याविषयी रेमो सांगतो, सलमान हा चांगला डान्सर असून तुम्ही जसे सांगता तसाच तो नाचण्याचा प्रयत्न करतो. सलमानसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. सध्याच्या नृत्यात अॅक्रोबॅटिक आणि जिम्नॅस्टिक्सचा सहभाग हा अविभाज्य बनला आहे. त्यामुळे सलमानने त्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच मजा येणार आहे. 

Also Read : या कारणामुळे सध्या रेमो डिसोझा चित्रपटात कोरिओग्राफी खूपच कमी करत आहे

Web Title: In the dance plus 3 competition, Salman Khan will choose his mentor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.