सरस्वती मालिकेच्या सेटवरील सरू आणि देविकाची ऑफ स्क्रीन धम्माल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:14 IST2017-10-06T09:44:52+5:302017-10-06T15:14:52+5:30
कलर्स मराठीवरील सरस्वती हि मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेमधील सरू म्हणजेच तितिक्षा आणि देविका म्हणजेच तुमची लाडकी जुई या ...

सरस्वती मालिकेच्या सेटवरील सरू आणि देविकाची ऑफ स्क्रीन धम्माल !
लर्स मराठीवरील सरस्वती हि मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेमधील सरू म्हणजेच तितिक्षा आणि देविका म्हणजेच तुमची लाडकी जुई या ऑफस्क्रीन चांगल्या मैत्रिणी असून त्या सेटवर सिन्सच्या मध्ये बरीच धम्माल करत असता. तब्बल १२/१३ तास एकत्र काम केल्यानंतर सेटवर एकत्र राहून हे बॉडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळत. मालिकेमध्ये सरू आणि देविका या दोघींच्या नात्यामध्ये जरी गैरसमज असले तरी देखील मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान या दोघीही सेटवर खेळी मेळीच वातावरण ठेवतात हे या फोटोमध्ये दिसून येते. या फोतोजना डिजिटल मीडियावर देखील बरेच लाईक मिळत आहेत. या फोटोजमध्ये जुई म्हणजेच देविका सरुच्या ठमीवर बसून मस्त सेटवर फेरफटका मारते आहे असे दिसत आहे. घरामधली सरस्वती आणि लक्ष्मी जेव्हा आनंदाने नांदते तेव्हा घर कसं छान आणि प्रसन्न राहतं, अस काहीसं हे फोटो बघून वाटते.
ALSO READ : सरस्वती फेम माधव देवचक्के झळकणार चित्रपटात
सरस्वती मालिकेमध्ये सध्या राघवने सरूला वाड्यामधून बाहेर काढले आहे पण, राघवच्या नकळत सरस्वती वाड्यामध्ये राहत आहे. देविकाच्या मनाला हे अजिबात पटत नाही कि, सरू वाड्यामध्ये रहाते आहे पण ती याविरोधात काही बोलत देखील नाही. सरू या वाड्यामध्ये निव्वळ मोठ्या मालकांचे रक्षण करण्यासाठी रहाते आहे. पण, देविका आणि सरूच्या नात्यातील ही ऑफस्क्रीन मज्जा पडद्यावर बघायला मिळेल का ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल यात शंका नाही.
काही दिवसांपूर्वीच सरस्वती मालिकेमध्ये नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला होता. सरस्वती आणि देविकाने मिळून घटस्थापना केली होती. सरस्वतीवर कोणतेही संकंट आले असले तरी पण ती देवाची पूजा, सणासुदीची तयारी मन लावून करताना आपल्याला नेहमीच दिसते.