बॅन्जोच्या सेटवर रंगले क्रिकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 23:29 IST2016-03-05T06:29:11+5:302016-03-04T23:29:11+5:30
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटात रितेश देशमुख सोबत बॉलीवुड अभिनेत्री नर्गिस फकरी झळकणार असल्यामुळे या चित्रपटाची चर्चा ही ...

बॅन्जोच्या सेटवर रंगले क्रिकेट
र ी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटात रितेश देशमुख सोबत बॉलीवुड अभिनेत्री नर्गिस फकरी झळकणार असल्यामुळे या चित्रपटाची चर्चा ही रंगत आहे. काही दिवसापूर्वी याच चित्रपटाच्या सेटवर रितेशच्या बिझी शेडयुलमुळे थेट त्याचा चिमुरडा रिआनच वडिलांना भेटण्यासाठी सेटवर पोहोचला. यावरून अंदाज बांधता येते की, कलाकार हे किती व्यस्त आहेत. याचाच खुलासा रवी जाधव यांनी केला सोशलमिडीयावर आहे. नॉनस्टॉप ३० दिवसाच्या शुटिंगनंतर फक्त दोन तासाचा वेळ मिळाल्यामुळे बॅन्जोची टीम ही रंगली क्रिकेटमध्ये. रितेश देशमुखची बॅटींग असल्यामुळे तो सेटवर सिक्स मारण्याच्या मूडमध्ये दिसत आहे.