मराठी मालिकांमधील ही जोडपी अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:01 IST2016-12-15T17:01:43+5:302016-12-15T17:01:43+5:30

‘गोठ’ या मालिकेत विलासची भूमिका साकारणारा समीर परांजपे आणि ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेत पार्थच्या भूमिकेत झळकत असलेला ...

This couple will be involved in the wedding of Marathis | मराठी मालिकांमधील ही जोडपी अडकणार लग्नबंधनात

मराठी मालिकांमधील ही जोडपी अडकणार लग्नबंधनात

ोठ’ या मालिकेत विलासची भूमिका साकारणारा समीर परांजपे आणि ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेत पार्थच्या भूमिकेत झळकत असलेला मंदार कुलकर्णी सध्या एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जात आहेत. या दोन्ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या दोन्ही मालिकांच्या प्रमुख पात्रांच्या आयुष्यात एक साम्य आहे. समीर आणि मंदार या दोघांचेही खऱ्या आयुष्यात नुकतेच लग्न झाले आहे आणि विशेष म्हणजे आता दोघांचेही मालिकेत लग्न झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खऱ्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर महिन्याभरात हे दोघे पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत.
गोठ आणि आम्ही दोघे राजा राणी या दोन्ही मालिकांच्या कथानकाला एक वळण मिळणार आहे. या कथानकानुसार या पुढील काही दिवसांत दोन्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांना लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. गोठ या मालिकेत बयो आजी सध्या विलासचे लग्न जुळवण्याच्या विचारात आहेत. बयो आजींचा स्वभाव असा आहे की, त्या जे काम हाती घेतात ते काम तडीस नेतात, त्यानुसार त्या विलासचे लग्न लावून देणार आहे. पण त्याचे लग्न कोणासोबत होणार हे कळण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 
Sameer Paranjape

‘आम्ही दोघे राजा राणी’मध्ये सध्या पार्थ आणि मधुरा यांची प्रेमकथा निर्णायक टप्प्यावर आहे. या दोघांच्या प्रेमाचे लग्नात होणारे रूपांतर याची धमाल प्रेक्षकांना आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
समीर आणि पार्थ यांचे खऱ्या आयुष्यात नुकतेच लग्न झाल्यामुळे मालिकांच्या चित्रीकरणानंतर त्यांच्या या लग्नाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्यामुळे दोघेही त्यांच्या मालिकांच्या चित्रीकरणासाठी खूप उत्सुक आहेत. 


Web Title: This couple will be involved in the wedding of Marathis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.