तारक मेहताच्या फॅन्ससाठी मोठी खूशखबर, हसण्याचा डोस होणार दुप्पट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:43 AM2019-03-27T10:43:19+5:302019-03-27T10:48:11+5:30

तारक मेहता का उल्टा चश्माच्या मेकर्ससाठी आणि फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब असलेली दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी लवकरच मालिकेत परत येण्याच्या तयारीत आहे.

confirm: 'Inverted glasses of Taraka Mehta, be ready for a fallback | तारक मेहताच्या फॅन्ससाठी मोठी खूशखबर, हसण्याचा डोस होणार दुप्पट!

तारक मेहताच्या फॅन्ससाठी मोठी खूशखबर, हसण्याचा डोस होणार दुप्पट!

तारक मेहता का उल्टा चश्माच्या मेकर्ससाठी आणि फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब असलेली दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी लवकरच मालिकेत परत येण्याच्या तयारीत आहे. मालिकेचे लेखक शैलेश लोढा यांनी ही माहिती दिली. एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये ते म्हणाले, दिशा नक्की मालिकेत परतणार आहे. तसेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान शैलेश यांनी दिशा परत येण्याची गोष्ट कन्फर्म केली आहे.


 दिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिले आहे. 30 दिवसांत दिशाने चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे.

 तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जानेवारीत मीडियाशी बोलताना सांगितले होते की, दिशाचा करार अद्याप रद्द करण्यात आलेला नाहीये. तसेच दिशाच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला घेण्याचा अद्याप तरी आमचा काहीही विचार नाहीये. तिने कार्यक्रमात परतणे हे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तिला परत यायचे असल्यास तिचे स्वागतच आहे. 


दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत असे. दिशा वाकानी म्हणजेच दया तिच्या माहेरी गेली असल्याचे मालिकेत दाखवण्यात आलेले आहे. पण ही गोष्ट मालिकेत दाखवून देखील वर्ष झाले आहे.  

Web Title: confirm: 'Inverted glasses of Taraka Mehta, be ready for a fallback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.