कॉमेडियन रहमान खान यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 08:09 IST2016-03-09T15:09:14+5:302016-03-09T08:09:14+5:30
दी ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३, मॅड इन इंडिया व कॉमेडी सर्कस अशा कॉमेडी शोमध्ये दिसलेला हास्यकलाकार रहमान खान याला ...

कॉमेडियन रहमान खान यास अटक
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३, मॅड इन इंडिया व कॉमेडी सर्कस अशा कॉमेडी शोमध्ये दिसलेला हास्यकलाकार रहमान खान याला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबईत राहणाºया एका ३० वर्षीय महिलेने गत २९ फेब्रुवारीला रहमानविरूद्ध मुंबईच्या सांताक्रूज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी रहमानला काल मंगळवारी अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी ‘वुई चॅट’च्या माध्यमातून पीडित महिला व रहमानची मैत्री झाली. यानंतर काही महिन्यांनी रहमानने या महिलेकडून २ लाख रुपए कर्ज घेतले. महिलेने पैसे परत मागितल्यावर रहमानने तिला एका हॉटेलात बोलवले व कथितरित्या बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर रहमान आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.