लग्नाच्या धामधुमीत कॉमेडियन भारती सिंगचा नाशिकला दोन दिवस मुक्काम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:16 IST2017-11-07T10:46:17+5:302017-11-07T16:16:17+5:30
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिच्या लग्नाची सध्या धामधूम असून, बॉलिवूडमधील बड्या बड्या सुपरस्टार्सना पत्रिका वाटण्याचे काम ती करीत आहे. ...

लग्नाच्या धामधुमीत कॉमेडियन भारती सिंगचा नाशिकला दोन दिवस मुक्काम !
प रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिच्या लग्नाची सध्या धामधूम असून, बॉलिवूडमधील बड्या बड्या सुपरस्टार्सना पत्रिका वाटण्याचे काम ती करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारती पत्रिका वाटण्यावरून तसेच प्री-वेडिंग फोटोशूटवरून चर्चेत राहत आहे. आता भारतीला या कामांमधून काहीशी विश्रांती हवी असून, त्यासाठी तिने नाशिक शहर निवडले आहे. होय, भारती दोन दिवसांसाठी नाशिकला मुक्कामी येत असून, केवळ हवाबदलाच्या विचाराने तिने नाशिक शहर निवडले आहे.
सध्या नाशिकमध्ये थंडीने चांगला जोर धरला असून, सर्वत्र रम्य असे वातावरण आहे. कदाचित याच विचाराने तिने नाशिक शहराला पसंती दिली असावी. दरम्यान, भारती ८ व ९ नोव्हेंबरला नाशिकमध्ये असेल. नाशिकमधील प्रसिद्ध सुला वायनरी याठिकाणी ती मुक्कामाला थांबणार आहे. यादरम्यान ती लग्नाशी संबंधित कुठलेही काम करणार नाही. केवळ विश्रांती घेण्याच्या हेतूनेच ती याठिकाणी राहणार आहे. दरम्यान, ३३ वर्षीय भारती लवकरच हर्ष लिंबचिया याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आणि हर्षने वेडिंग फोटोशूट केले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंतही केले गेले. दोघेही येत्या ३ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
![]()
दरम्यान, गोवा येथे लग्न झाल्यानंतर हे दोघेही हनिमूनला यूरोप येथे जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारती लग्नाच्या धामधुमीत व्यस्त होती. कधी शॉपिंग करण्यात, तर कधी लग्नपत्रिका वाटण्यासाठी तिची धावपळ सुरू असल्याचे दिसत होते. नुकतीच भारतीने हर्षला तिच्या घरी अमृतसर येथे नेले होते. यावेळी दोघांनी गोल्डन टेम्पल येथेही भेट दिली होती. त्याचे फोटोही त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी तब्बल आठ वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकण्याचा विचार केला आहे. ‘झलक दिखला जा’ मध्ये ही जोडी एलिमिनेट झाल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला होता.