​राजीव खंडेलवाल करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 12:52 IST2017-05-03T07:22:44+5:302017-05-03T12:52:44+5:30

राजीव खंडेलवालने क्या हादसा क्या हकीगत या मालिकेद्वारे त्याच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत त्याने एक नकारात्मक ...

Comeback on small screens by Rajiv Khandelwal | ​राजीव खंडेलवाल करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

​राजीव खंडेलवाल करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

जीव खंडेलवालने क्या हादसा क्या हकीगत या मालिकेद्वारे त्याच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत त्याने एक नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर तो कही तो होगा या मालिकेत झळकला. या मालिकेने त्याचे संपूर्ण करियरच बदलले. या मालिकेमुळे त्याचे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेने राजीवला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. दहा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव आवर्जून घेतले जात असे. त्याला या मालिकेसाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. 
या मालिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्याने मोठ्या पडद्यावर आपले भाग्य आजमावयचे ठरवले. आमिर हा त्याचा चित्रपट आणि त्याच्या साकारलेली त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर शैतान, टेबल नं 21 यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले. त्याचे हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. छोट्या पडद्यावर त्याला प्रेक्षकांनी पसंती दिली असली तरी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर तो पुन्हा मालिकांकडे वळला. त्याने क्रितिका कार्मासोबत रिपोटर्स या मालिकेत काम केले होते आणि आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे.
लाइफ ओके या वाहिनीवर लवकरच रावडी रासकल्स ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत राजीव प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे कळतेय. या मालिकेत तो एका पायलटची भूमिका साकारत असून त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव महेश पांडे असणार आहे. 
राजीव खंडेलवाल याने फिव्हर या चित्रपटात काही दिवसांपूर्वी गौहर खानसोबत काम केले होते. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळवता आले नाही. 

Web Title: Comeback on small screens by Rajiv Khandelwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.