चला हवा येऊ द्या च्या सेटवर होम मिनिस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:02 IST2018-04-12T09:32:02+5:302018-04-12T15:02:02+5:30

विश्वदौऱ्यानंतर जगभरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ त्याच्या मूळ रूपात रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज ...

Come on let's set up the Home Minister | चला हवा येऊ द्या च्या सेटवर होम मिनिस्टर

चला हवा येऊ द्या च्या सेटवर होम मिनिस्टर

श्वदौऱ्यानंतर जगभरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ त्याच्या मूळ रूपात रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पण या कार्यक्रमातील थुकरट वाडीचं आता एक आदर्श गाव झालेलं असून या आदर्श गावाला भेट देण्यासाठी पहिले पाहुणे आले ते म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम वाहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांची सौ सुचित्रा बांदेकर. या भागाचे अजून एक विशेष आकर्षण म्हणजे, या भागात होम मिनिस्टर मध्ये सहभागी झालेल्या वहिनींनी त्यांनी होम मिनिस्टर मध्ये जिंकलेल्या पैठणी साड्या नेसून मंचावर हजर झाल्या आणि त्यांनी आदेश भावोजी आणि सुचित्रा वाहिनीचं औक्षण केलं. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या शुभहस्ते या नव्या सेटचे उदघाटन करण्यात आले.

धमाल मजा मस्तीत रंगलेल्या या भागात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी सैराट झाला जी  या गाण्यावर नृत्य देखील केले. चला हवा येऊ द्या ची अतरंगी टीम आणि आदेश भावोजी यांच्या रंगलेली जुगलबंदी तसेच थुकरट वाडीतील वांदेकर भावोजी आणि ओरिजनल बांदेकर भावोजी यांचा आमना सामना पाहणे रंजक ठरेल आणि प्रेक्षकांना त्यांचा लाफ्टर डोस मिळेल यात शंकाच नाही.

आदेश बांदेकर आणि त्याची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचे लव्ह मॅरेज झाले आहे आणि त्यांची प्रेमकथा खूपच इंटेरेस्टिंग आहे. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केले होते. आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या इथे आदेश अनेक वेळा जात असे. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तूला होकार देणार नाही असे सुचित्रा त्यांना बोलली होती. पण आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. आदेश त्यांची अनेक तास वाट पाहत बसले होते. पण त्या काही आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी ते सुचित्रा यांच्या घरी गेले. पण सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. पण काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. आदेश मस्त त्यांच्या आईशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच निघाले. पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असे कारण देत तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश खूप चिडलेले होते. मला हो तर हो नाही तर नाही सांग मी तुला पुन्हा विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे असे आदेश म्हणाले. त्यावर थोड्याच वेळात महालक्ष्मीला कधी जायचे असे सुचित्राने आदेशला विचारले. आदेश यांनी अशा वेगळ्यात अंदाजात सुचित्राच्या घरात त्यांना प्रपोज केले होते.

Web Title: Come on let's set up the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.