'रीयल लाइफ कपल' चित्रपटात ही एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 22:55 IST2016-03-05T05:55:14+5:302016-03-04T22:55:14+5:30
चित्रपट असो या मालिका या क्षेत्रातील रीयल लाइफ कपलची इच्छा असते की, पडदयावरदेखील एकत्रित झळकावे. ही इच्छा सध्या पूर्ण ...

'रीयल लाइफ कपल' चित्रपटात ही एकत्रित
च त्रपट असो या मालिका या क्षेत्रातील रीयल लाइफ कपलची इच्छा असते की, पडदयावरदेखील एकत्रित झळकावे. ही इच्छा सध्या पूर्ण झाली आहे. ती सौरभ गोखले व अनुजा साठे या क्युट कपलची. ही रीयल लाइफ जोडी आता रील कपल म्हणून देखील झळकणार आहे. योद्धा,शिनमा, परतु या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाºया सौरभ गोखले व सध्या गाजत असलेल्या तमन्ना या मालिकेत हटके भूमिका साकारणारी अनुजा साठे आता, २२ एप्रिलला प्रदर्शित होणाºया 'भो भो' या चित्रपटात पहिल्यांदाच आॅन स्क्रीन दिसणार आहेत. लग्नानंतर प्रथमच अभिनेता सौरभ गोखले व त्याची पत्नी अनुजा या चित्रपटात एकत्र येणार आहे. भरत गायकवाड दिग्दर्शित 'भो भो' हा सस्पेन्स थ्रिलर असून तो विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. या चित्रपटात प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले या तगडया कलाकारांचा देखील समावेश अहे. चला तर या रिअल लाईफ जोडीची रील लाईफ केमिस्ट्री पाहण्यासाठी थोडी वाट पाहूयात.