कॉफी विथ शाहरूख-आलिया !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 17:12 IST2016-10-27T17:12:55+5:302016-10-27T17:12:55+5:30
सेलिब्रेटी टॉक शो कॉफी विथ करण पर्व 5 वे या शो मध्ये शोच्या ओपनिंगला कोणता कलाकार हजेरी लावणार याविषयी ...

कॉफी विथ शाहरूख-आलिया !
स लिब्रेटी टॉक शो कॉफी विथ करण पर्व 5 वे या शो मध्ये शोच्या ओपनिंगला कोणता कलाकार हजेरी लावणार याविषयी ब-याच दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात होते. मात्र आता खुद्द करण जोहरनेच सोशल मिडियावर शोच्या ओपनिंगल शाहरूख खान आणि आलिया भट्ट हे पहिले पाहुणे कलाकर येणार असल्याची माहिती दिलीय. करणने या शोचा सेटचा एक फोट सोशल मिडियावर अपडेट केला आहे. तर दुसरीकडे शहारुखने ओपनिंग शोला बोलावल्यामुळे आभार मानलेत. नेहमीच करण जोहरसह या शोमध्ये हजेरी लावणे मला आवडते. पुन्हा एकदा शोच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. मजा करतो. तसेच करण माझा चांगला मित्रही आहे. तो जेव्हा जेव्हा मला बोलावतो मला नाही बोलणे शक्यच होत नाही. त्यामुळे कितीही बिझी असलो तरी मित्रासाठी वेळ काढतो असेही शाहरूखने म्हटले आहे. तर आलिया भट्टला इंडस्ट्रीत ओळख मिळवून देण्यात करण जोहरचा मोठा वाटा आहे. या शोमध्ये हजेरी लावणे माझ्यासाठी एक अभिमानस्पद होते असे आलियाने म्हटले आहे.अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ करणच्या शोमध्ये हजेरी लावताना दिसतील. गौरी शिंदे शोची लेखिका असून खुद्द करण जोहर शोचा निर्माता आहे. येत्या 6 नोव्हेबरपासून कॉफी विथ करण रसिकांच्या भेटीला येणार आहे.