कोरिओग्राफर गीता माँ या व्यक्तीच्या होती प्रेमात, अद्याप केलं नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:31 PM2021-07-05T16:31:41+5:302021-07-05T16:32:34+5:30

कोरिओग्राफर गीता कपूर सध्या छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

Choreographer Geeta Maa was in love with this person, not married yet | कोरिओग्राफर गीता माँ या व्यक्तीच्या होती प्रेमात, अद्याप केलं नाही लग्न

कोरिओग्राफर गीता माँ या व्यक्तीच्या होती प्रेमात, अद्याप केलं नाही लग्न

googlenewsNext

बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर गीता कपूर सध्या छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. याशिवाय गीता माँने इंडिया डान्स, सुपर डान्स, इंडिया के मस्त कलंदर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या रिएलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. गीताने वयाच्या १५व्या वर्षापासूनच डान्समधील करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘तुझे याद ना मेरी आइ’ आणि ‘गोरी गोरी’ अशा अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. गीता कपूरने फराह खान यांच्या डान्स ग्रूपमध्येही काम केले आहे.

गीता कपूरने फराह खानला असिस्ट केले होते. त्यानंतर तिने कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल हो ना हो, मैं हूं ना आणि ओम शांति ओम अशा अनेक चित्रपटांसाठी सहायक कोरिओग्राफर म्हणून काम केले. त्यानंतर तिने फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, अलादीन, तीस मार खान या चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केली. त्यानंतर गीता कपूरला लोकप्रियता मिळाली.


४८ वर्षीय गीता कपूरने अद्याप लग्न केलेले नाही. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर सिंदूर लावलेले फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिचे लग्न झाले अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र एका शूटसाठी तिने असा लूक केल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यापूर्वी गीताचे नाव कोरिओग्राफर राजीव खिंचीसोबत जोडले गेले होते.

राजीव हा एक दिग्दर्शक, अभिनेता आणि कोरिओग्राफर आहे. गीता आणि राजीवचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ते नेहमी एकत्र फिरताना दिसत होते. पण राजीव हा जवळचा मित्र असल्याचे गीता माँने सांगितले होते.

Web Title: Choreographer Geeta Maa was in love with this person, not married yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.