​चंदन प्रभाकर परतला द कपिल शर्मा शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 04:27 AM2017-06-24T04:27:08+5:302017-06-24T09:57:08+5:30

द कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना चंदन प्रभाकरला पुन्हा पाहाता येणार आहे. चंदनने ...

Chandan Prabhakar Purnala The Kapil Sharma at the show | ​चंदन प्रभाकर परतला द कपिल शर्मा शोमध्ये

​चंदन प्रभाकर परतला द कपिल शर्मा शोमध्ये

googlenewsNext
कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना चंदन प्रभाकरला पुन्हा पाहाता येणार आहे. चंदनने या कार्यक्रमासाठी पुन्हा चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. चंदन या कार्यक्रमात चायवाला चंदू ही व्यक्तिरेखा साकारतो. त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते. चंदन परतणार असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यानेच दिली आहे. कार्यक्रमात पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. 
चंदन आणि कपिलमध्ये दरम्यानच्या काळात मदभेद झाल्याने त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला होता. कपिल शर्मा आणि त्याची टीम एका शो साठी सिडनीला गेली होती. पण तिथून परतत असताना विमानात कपिल शर्माने खूप मद्यापान केले होते. त्याच्या टीमने त्याच्या आधी जेवलेले त्याला रुचलेले नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या टीमला खडे बोल सुनावले होते. एवढेच नाही तर त्याने सुनील ग्रोव्हरवर हात उचलला होता. तसेच अली असगर आणि किकू शारदा द कपिल शर्मा शोमध्ये स्त्री व्यक्तिरेखा साकारतात त्यावरून देखील त्याने त्या दोघांना डिवचले होते. यानंतर सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी हा कार्यक्रम सोडला होता.
पण चंदन आता सगळे मदभेद विसरून द कपिल शर्मा शो मध्ये परतला आहे. कार्यक्रमात परतायला इतका वेळ का लागला असे त्याला फेसबुक लाइव्हच्या दरम्यान विचारण्यात आले होते. यावर कपडे ओले झाल्यानंतर ते सुकायला वेळ लागतात. त्याचप्रमाणे त्याच्यात आणि कपिलमधील झालेली भांडणे पूर्णपणे मिटायला वेळ लागला असे तो सांगतो. 

Also Read : अली असगरने सांगितले द कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण

Web Title: Chandan Prabhakar Purnala The Kapil Sharma at the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.