चक्रव्यूह या मालिकेत होणार प्रणित भट्टची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 13:31 IST2017-06-13T07:59:21+5:302017-06-13T13:31:46+5:30
चक्रव्यूह या मालिकेत संगीता घोष, नारायणी शास्त्री, महिमा मकवाणा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच ...
चक्रव्यूह या मालिकेत होणार प्रणित भट्टची एंट्री
च ्रव्यूह या मालिकेत संगीता घोष, नारायणी शास्त्री, महिमा मकवाणा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत माय-लेकींमधील कडवट कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे.
या मालिकेत नारायणी शास्त्री सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर महिमा मकवाणा अनामी ही भूमिका साकारणार आहे. ती आपल्या सावत्र पालकांचा अतिशय आदर करते. तसेच ती एक आनंदी, खेळकर मुलगी आहे असे दाखवण्यात येणार आहे. पण या 17 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील काही रहस्य कळल्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे असे आपल्याला पाहायला मिळणार आहे. देस में निकला होगा चाँद फेम संगीता घोष या मालिकेत सुधा ही भूमिका साकारणार आहे. सुधा या भूमिकेला नकारात्मक छटा असून या भूमिकेमुळे कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत.
तसेच या मालिकेत प्रणित भट्टदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रणितने महाभारतमध्ये साकारलेली शकुनीची भूमिका गाजली होती. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. बिग बॉसमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता तो चक्रव्यूह या मालिकेत एका नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सत्तेची हाव असलेल्या नायकाची भूमिका या मालिकेत तो साकारणार आहे.