चक्रवर्ती अशोक सम्राट फेम सिद्धार्थ निगम दिसणार चंद्र नंदिनीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 14:17 IST2017-07-31T08:47:16+5:302017-07-31T14:17:16+5:30

चंद्र-नंदिनी ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत बिंदुसारची ...

Chakraborty Ashok Samrat Fame Siddhartha Corporation will be seen in Chandrande Nandini | चक्रवर्ती अशोक सम्राट फेम सिद्धार्थ निगम दिसणार चंद्र नंदिनीमध्ये

चक्रवर्ती अशोक सम्राट फेम सिद्धार्थ निगम दिसणार चंद्र नंदिनीमध्ये

द्र-नंदिनी ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत बिंदुसारची भूमिका साकारणारा बालकलाकार प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. पण प्रेक्षकांचा हा लाडका बिंदुसार प्रेक्षकांना मोठा झालेला पाहायला मिळणार आहे. लीपनंतर सिद्धार्थ निगम या मालिकेत प्रेक्षकांना बिंदूसारच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ निगमने धूम ३ या चित्रपटात काम केले होते. तसेच चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेत त्याने अशोक सम्राट यांची भूमिका साकारली होती. 
चंद्र नंदिनी या मालिकेत श्वेता बासू आणि रजत टोकस प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण या मालिकेची लोकप्रियता कमी झाली असल्याने या या मालिकेच्या निर्मात्यांनी लीप घेण्याचे ठरवले आहे. सिद्धार्थ निगम खूप प्रसिद्ध असल्याने त्याच्या एंट्रीनंतर मालिकेच्या टीआरपीमध्ये नक्कीच फरक पडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. लीपनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. लीपनंतर चंद्र आणि नंदिनी यांच्यात दुरावा आल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चंद्र आणि नंदिनी यांच्यात खूप भांडणं होणार असून ते एकमेकांचे शत्रू होणार आहेत. तसेच चंद्र अतिशय क्रूर झाल्याचे दाखवण्यात येणार आहे.
बिंदूसार ही भूमिका सुरुवातीला अयान रहमानी साकारणार असल्याची चर्चा होती. अयानने पेशवा बाजीराव या मालिकेत चिमाजी अप्पांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. लीपनंतर त्याची मालिकेत एंट्री होणार असल्याची चर्चा होती. पण आता अयान नव्हे तर सिद्धार्थ निगम या मालिकेत दिसणार आहे.
सिद्धार्थचा या मालिकेतील लूक हा खूप वेगळा असणार असून या मालिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत असल्याचे कळतंय. 

Also Read : OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !

Web Title: Chakraborty Ashok Samrat Fame Siddhartha Corporation will be seen in Chandrande Nandini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.