n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">एक मा जो बनी लाखो की अम्मा ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेची निर्मिती असिफ शेखची आहे. असिफ आज निर्माता बनला असला तरी त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. असिफ सुरुवातीला एक सुतार म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने प्रोडक्शन हाऊसेसमध्ये छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली. त्याने आशिक बनाया अपने, मे मेरी पत्नी और वो या चित्रपटांच्या प्रोडक्शन टीमसोबतही काम केले आहे. तो प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्यासोबतच सुनील शेट्टीचा बिझनेस मॅनेजर म्हणूनही काम करत होता. आज इतक्या वर्षांच्या स्ट्रगलनंतर असिफने मालिकेची निर्मिती केली आहे. तो त्याला मिळालेल्या या यशासाठी खूप आनंदी आहे.
![]()
Web Title: Carpenter maker
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.