​बाहुबली फेम रेवंथने मिळवला इंडियन आयडल 9चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 10:33 IST2017-04-03T05:03:14+5:302017-04-03T10:33:14+5:30

इंडियन आयडल 9चा किताब कोण मिळवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. रेवंथ, खुदा बख्श आणि रोहित यांची अंतिम तीनमध्ये ...

The Book of Indian Idol 9, by Bahubali Fame Rev. | ​बाहुबली फेम रेवंथने मिळवला इंडियन आयडल 9चा किताब

​बाहुबली फेम रेवंथने मिळवला इंडियन आयडल 9चा किताब

डियन आयडल 9चा किताब कोण मिळवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. रेवंथ, खुदा बख्श आणि रोहित यांची अंतिम तीनमध्ये निवड झाली होती. पण खुदा बख्श आणि रोहित यांना मागे टाकत रेवंथ इंडियन आयडल बनला. 
रेवंथ हे नाव बॉलिवूडसाठी नवीन असले तरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तो खूपच प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत दक्षिणेत 200हून अधिक गाणी गायली आहेत. बाहुबली या प्रसिद्ध चित्रपटातदेखील त्याने गाणे गायले आहे. इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या ऑडिशनपासून रेवंथने प्रेक्षक आणि परीक्षकांचे मन जिंकले होते. रेवंथ बॉलिवूडमधील सगळीच गाणी खूपच चांगल्याप्रकारे गात असला तरी त्याला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी अजिबातच बोलता येत नव्हते. 
रेवंथला इंडियन आयडलचा विजेता म्हणून एक ट्रॉफी आणि 25 लाख रुपये देण्यात आले. त्याचसोबत युनिव्हर्सल म्युझिकसोबत त्याला एक करार साइन करायला मिळाला. या त्याच्या विजयामुळे तो खूपच खूश आहे. तो सांगतो, "माझे हे यश मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मी आज गगनाला हात टेकले आहेत असेच मला वाटत आहे. इंडियन आयडल ही एक सुरुवात असून मला आयुष्यात पुढे खूप प्रगती करायची आहे. मी एक दाक्षिणात्य गायक असल्याने माझ्यासाठी हे विजेतपद मिळवणे खूपच कठीण होते. या कार्यक्रमाने आज माझे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे."
इंडियन आयडलमध्ये खुदा बख्शला दुसऱ्या तर रोहितला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या कार्यक्रमाच्या फिनालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती. सचिनने नुकतेच सोनू निगमसोबत क्रिकेटवाली बीट पे हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी सचिन कार्यक्रमात आला होता. त्याचसोबत कपिल शर्मासोबत झालेल्या भांडणामुळे सध्या चर्चेत असलेल्या सुनील ग्रोव्हरनेदेखील या कार्यक्रमात येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवले. 

Web Title: The Book of Indian Idol 9, by Bahubali Fame Rev.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.