​बिपाशा बासूने लाइक केली करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्व पत्नीची म्हणजेच जेनिफर विंगेटची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 10:13 IST2017-06-05T04:43:28+5:302017-06-05T10:13:28+5:30

​बिपाशा बासूने करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्व पत्नीची म्हणजेच जेनिफर विगेंटची सोशल नेटवर्किंगवरची एक पोस्ट नुकतीच लाइक केली आहे. बिपाशाने पोस्ट लाइक केल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Bipasha Basunike Like K Karan Singh Grover's former wife, Jennifer Wingate's post | ​बिपाशा बासूने लाइक केली करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्व पत्नीची म्हणजेच जेनिफर विंगेटची पोस्ट

​बिपाशा बासूने लाइक केली करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्व पत्नीची म्हणजेच जेनिफर विंगेटची पोस्ट

ण सिंग गोव्हरने गेल्या वर्षी बिपाशा बासूसोबत लग्न केले. बिपाशासोबत लग्न करण्याआधी करणची दोन लग्नं झाली होती. त्याने पहिले लग्न श्रद्धा निगम या अभिनेत्रीसोबत केले होते. श्रद्धाने चुडियाँ, कृष्णा अर्जुन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण लग्नानंतर काहीच महिन्यात श्रद्धा आणि करण वेगळे झाले. करणचे निकोल अॅव्हरस या कोरिओग्राफरसोबत प्रेमसंबंध असल्याने श्रद्धाने करणला घटस्फोट दिला होता. त्यानंतर काहीच महिन्यात करणने जेनिफर विंगेटशी लग्न केले. जेनिफर आणि करण दिल मिल गये या मालिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये सूत जमले. पण करणच्या आयुष्यात बिपाशा बासू आल्यानंतर त्याने जेनिफरसोबत असलेले नाते संपुष्टात आणले आणि धुमधडाक्यात बिपाशासोबत लग्न केले.
बिपाशा आणि करण त्यांच्या आयुष्यात सध्या खूपच खूश आहेत. जेनिफरने देखील करण आणि बिपाशाच्या लग्नानंतर मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत करण आणि बिपाशा यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण असे असूनही ती त्यांच्या दोघांपासूनच दूरच राहाण्याचा प्रयत्न करते. मात्र बिपाशाने जेनिफरची सोशल मीडियावरची एक पोस्ट नुकतीच लाइक केली आहे. यावरून बिपाशा जेनिफरसोबत मैत्री करू इच्छिते या चर्चेला उधाण आले आहे.
जेनिफर विंगेटचा वाढदिवस नुकताच झाला. तिच्या वाढदिवसाला तिच्या फॅन्सनी आणि सहकाऱ्यांनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या बेहद या मालिकेच्या टीमने तर तिचा वाढदिवस खूप चांगला साजरा केला होता. त्यामुळे सहकलाकारांचे आणि फॅन्सचे आभार मानण्यासाठी तिने एक खूप छान व्हिडिओ इन्स्टाग्रामला पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओला बिपाशा बासूने लाइक केले आहे. बिपाशाने जेनिफरच्या व्हिडिओला लाइक केल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

 
 

Web Title: Bipasha Basunike Like K Karan Singh Grover's former wife, Jennifer Wingate's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.