टिव्ही जगतातील या बिकनी बेब्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:54 IST2016-12-29T15:54:40+5:302016-12-29T15:54:40+5:30

मालिकांमध्ये आज्ञाधारक सूनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री या त्यांच्या खऱ्या आयुष्यात या खूपच वेगळ्या असतात. मालिकेत काम करत असताना व्यक्तिरेखेच्या ...

The Bikini Babes Live TV | टिव्ही जगतातील या बिकनी बेब्स

टिव्ही जगतातील या बिकनी बेब्स

लिकांमध्ये आज्ञाधारक सूनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री या त्यांच्या खऱ्या आयुष्यात या खूपच वेगळ्या असतात. मालिकेत काम करत असताना व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार त्यांना साड्या आणि भरजरी दागिने घालावे लागतात. पण चित्रीकरण नसताना हे कलाकार एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळतात. नेहमीच भारतीय वेशभूषेत वावरणाऱ्या टिव्हीवरील अभिनेत्रींचे पाहा हे बिकनीतील रूप...

गौहर खानने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ती बिग बॉसच्या घरात असताना तिचे कुशल टंडनसोबत सूत जुळले होते. पण घरातून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

gauhar khan in bikini 

श्वेता साळवेने हिप हिप हुर्रे, लेफ्ट राईट लेफ्ट, लिपस्टिक यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. श्वेताने 2016मध्ये बाळाला जन्म दिला. तिने गरोदरपणात केलेले फोटोशुट खूपच गाजले होते. ती छोट्या पडद्यावरची एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. 
shweta salve in bikini

मंदिरा बेदी गेली अनेक वर्षँ छोट्या पडद्यावर काम करत आहे. तिची नव्वदीच्या दशकात शांती ही मालिका खूप गाजली होती. काही वर्षांपूर्वी ती अनिल कपूरसोबत 24 या मालिकेत झळकली होती. मंदिराने वर्ल्ड कपच्यावेळी एक्स्ट्रा इनिंगमध्ये घातलेल्या साड्या या चर्चेचा विषय बनल्या होत्या. वर्ल्ड कपनंतर एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी तिची ओळख बनली. 
mandira bedi in bikini

सुरवीन चावलाने कही तो होगा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली. या मालिकेनंतर ती अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये झळकली. पण ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली ते क्रिकेटर श्रीसंतसोबत असलेल्या तिच्या प्रेमप्रकरणामुळे... श्रीसंत आणि ती अनेक पार्टींमध्ये एकत्र दिसत असत. पण काहीच दिवसांत त्यांचे ब्रेकअप झाले. 24च्या दुसऱ्या सिझनमध्ये सुरविनने अनिल कपूरसोबत चुबंनृश्य दिले होते. त्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा झाली होती.

Surveen chawla in bikini

कसोटी जिंदगी की फेम श्वेता तिवारीने मालिकेत काम करण्यासोबतच झलक दिखला जा, बिग बॉस यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. इस जंगल से मुझे बचाओ या रिअॅलिटी शोमध्ये तिने बिकनी घातली होती. छोट्या पडद्यावर अतिशय सौज्वळ मुलीच्या भूमिकेत वावरलेल्या श्वेताचे हे रूप पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. 

Shweta Tiwari in bikini

संगीता घोष एक स्टायलिश अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. किस देस में होगा मेरा दिल या मालिकेत संगीताने घातलेल्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली होती.
sangeeta ghosh in bikini

करिश्मा तन्ना ही तिच्या मालिकांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. बिग बॉसमध्ये असताना उपेन पटेलसोबत तिचे सूत जुळले होते. उपेन आणि करिश्माचे फॅन त्यांना प्रेमाने उपमा असेच म्हणत असत. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअपचा विचार केला. करिश्मा तिच्या हटके अंदाजासाठीच ओळखली जाते.
karishma tanna in bikini


बरखा बिष्ट अनेक मालिकांमध्ये साड्यांमध्ये दिसत असली तरी पुरस्कार सोहळ्यांच्यावेळी ती नेहमीच वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसून येते. बरखा नेहमीच हटके स्टाइलमध्ये दिसून येते.  
barkha bisht in bikini

हंसिका मोटवानीने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत ती झळकली होती. आज ती बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही इंडस्ट्रीत काम करत आहे.
hansika motwani in bikini





 

Web Title: The Bikini Babes Live TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.