Bigg Boss12 Day 4 : एकीकडे गुलाब मिळवण्यासाठी धडपड तर दुसरीकडे रंगला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 22:30 IST2018-09-20T19:56:56+5:302018-09-20T22:30:00+5:30
Bigg Boss12 Day 4 Update: बिग बॉस सीझन बाराच्या चौथ्या सीझनमध्ये राजकुमारी नटून थटून राजकुमार अनुप जलोटा यांना खुश करण्यात गुंतल्या होत्या. खरेतर यात राजकुमारींना राजकुमार अनुप जलोटा यांच्याकडून एक फुल घ्यायचे होते.

Bigg Boss12 Day 4 : एकीकडे गुलाब मिळवण्यासाठी धडपड तर दुसरीकडे रंगला वाद
बिग बॉस १२च्या स्पर्धकांना चौथ्या दिवशी वेगळा टास्क देण्यात आला होता. अनुप जलोटा राजकुमाराच्या भूमिकेत असणार आणि घरातील इतर सदस्या त्यांची सेवा करणार व यादरम्यान कृती, दीपिका व रोशमी राजकुमारीच्या भूमिकेत राहून त्यांचे मनोरंजन करणार असे या टास्कमध्ये सांगण्यात आले होते.
कलर्स वाहिनीवरील बिग बॉस सीझन बाराच्या चौथ्या सीझनमध्ये राजकुमारी नटून थटून राजकुमार अनुप जलोटा यांना खुश करण्यात गुंतल्या होत्या. खरेतर यात राजकुमारींना राजकुमार अनुप जलोटा यांच्याकडून एक फुल घ्यायचे होते. या दरम्यान दीपिका, कृती 'दिल चीज क्या है आप मेरी' या गाण्यावर थिरकत राजकुमारला खूश करण्याचा प्रयत्न करत होत्या. रोशमी राजकुमारला म्हणते की, तुमचे मन जिंकण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यावर जसलीन म्हणते की मी विचार करते आहे की त्यांना स्विमिंग करायला लावूयात. त्यावर अनुप म्हणाले की, जर स्विमिंग करायचे आहे तर लेहंगा चोलीमध्ये थोडी कोण स्विमिंग करते. त्यावर कृती म्हणते की मी खूप समजूतदार आहे मी कपडे बदलून येईन. मात्र रोशमी स्विमिंग करून राजकुमार अनुप जलोटा यांना खूश करते आणि गुलाबाचे फुल जिंकते.
या टास्क दरम्यान अनुप जलोटा सनी लियोनचे 'बेबी डॉल' गाणे क्लासिकल अंदाजात गाताना दिसले. त्यावेळी गायक दीपक ठाकूर अनुप जलोटा यांचे पाय दाबतो तर श्रीसंथ पंख्याने वारा घालताना दिसला.
श्रीसंथ व शिवाशीष यांच्यामध्ये भांडणे होतात. श्रीसंथचा पारा इतका चढतो की तो शिवाशीषला शिवीगाळ करतो. त्यावर श्रीसंथ महिला स्पर्धकांसमोर मी शिवी दिल्याचे कबूल केले. श्रीसंथची अशी वर्तणूक पाहून शिवाशीष नाराज होऊन म्हणाला की 'हा सेलिब्रेटी असेल त्याच्या घरचा.'