Bigg Boss11: घरात बंदगीचे कारनामे पाहून तिच्या वडिलांची बिघडली तब्येत,रूग्णालयात केले दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 14:48 IST2017-11-16T09:18:38+5:302017-11-16T14:48:38+5:30

सध्या बिग बॉसच्या घरात असे एक स्पर्धकांची जोडी आहे. जे इतर स्पर्धकांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. ते स्पर्धक म्हणजे पुनीश ...

Bigg Boss11: Seeing her accomplishments in the house, her father was taken ill, hospitalized! | Bigg Boss11: घरात बंदगीचे कारनामे पाहून तिच्या वडिलांची बिघडली तब्येत,रूग्णालयात केले दाखल!

Bigg Boss11: घरात बंदगीचे कारनामे पाहून तिच्या वडिलांची बिघडली तब्येत,रूग्णालयात केले दाखल!


/>सध्या बिग बॉसच्या घरात असे एक स्पर्धकांची जोडी आहे. जे इतर स्पर्धकांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. ते स्पर्धक म्हणजे पुनीश शर्मा आणि बंदगी.दोघेही बिग बॉसच्या घरात का राहतायेत असा प्रश्न आता  घरातल्या स्पर्धकांनाही पडला आहे.गेल्याच वेळी विकेंड का वॉर या भागात  सलमान खानने बंदगी आणि पुनिशला घरात सर्वत्र कॅमेरे लावलेले आहेत.त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टी कॅमे-यात कैद होत आहेत. घरात वावरताना थोडी काळजी घ्या कारण हा एक फॅमिली शो आहे असे सांगत दोघांना चांगलेच फटकारले होते. मात्र तरीही या गोष्टीचा दोघांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसतंय. दिवसें दिवस या दोघांचे घरात व्हल्गर  कारनाम्यामुळे रसिकांसह स्पर्धकही हैराण झाले आहेत.

एकीकडे बंदगीला वारंवार समजावूनही तिला काही कळत असूनही वळत नसल्याचे  दिसतंय.हेच पाहून घराबाहेर मात्र तिच्या वडीलांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. तिच्या वडीलांना रूग्णालयाच दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.नॅशनल चॅनलवर बंदगीचे अशा वागण्याने तिची फॅमिली चांगलीच टेंन्शनमध्ये असल्याचे समजतंय.त्यामुळे आता तरी बंदगी घरात नीट वागणार अशी आशा करूया.बंदगी आणि पुनीश यांच्या खुलेआम होणा-या रोमान्समुळेबिग बॉस शोकडे रसिकांनीही पाठ फिरवली आहे.त्यामुळे टीआरपीमध्ये टॉप टेनच्या यादीतसुद्धा हा शो आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. 

बिग बॉस हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. घरात रंगणारा रोमान्समुळे तर हा शो नेहमीच वादाच्या भोव-यात अडकतो. यावेळीही चित्र काही वेगळे नसून जैसे थे तिच परिस्थीती यंदाही पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा विषय काढताच आता पुनीष शर्मा आणि बंदगी कालराचा रोमान्स चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोघे बिग बॉसच्या घरात एवढ्या बिनधास्तपणे रोमान्स करीत आहेत की, प्रेक्षकांनाच आता या दोघांचा संताप यायला लागला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या शोचा होस्ट असलेल्या सलमान खानवरही टीका करीत असून, शोचा टाइम रात्री बारा वाजता का ठेवला नाही? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. 

Web Title: Bigg Boss11: Seeing her accomplishments in the house, her father was taken ill, hospitalized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.