Bigg Boss11: ढिंण्चॅक पूजाने उघड केले हे रहस्य,शिकागोमध्ये राहतो तिचा बॉयफ्रेंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:08 IST2017-11-03T09:38:56+5:302017-11-03T15:08:56+5:30
मुळची दिल्लीची रॅपर ढिंण्चॅक पूजाचे खरे नाव पूजा जैन आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाल्यानंतर तिच्याबद्दलच्या अनेक ...

Bigg Boss11: ढिंण्चॅक पूजाने उघड केले हे रहस्य,शिकागोमध्ये राहतो तिचा बॉयफ्रेंड!
म ळची दिल्लीची रॅपर ढिंण्चॅक पूजाचे खरे नाव पूजा जैन आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाल्यानंतर तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असणारच.नुकताच पूजाने सब्यासासह एक रहस्य उघड केले आहे. सध्या घरात आकाश आणि लवसह तिचं नाव जोडले जात असल्यामुळे वैतागलेल्या पूजाने हा खुलासा केला आहे. वास्तविक जीवनात तिला बॉयफ्रेंड आहे. आणि तो दिल्ली किंवा मुंबईत राहत नसून शिकागोमध्ये राहतो. होय, हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटलेच असणार.मात्र खुद्द पूजानेच ही गोष्ट उघड केली असल्यामुळे तिच्या या शिकागोच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसच्या घरातही चर्चा रंगत आहे. ढिंण्चॅक पूजाने बिग बॉसच्या घरात एंट्री करताच सारे स्पर्धक हैराण झाले होते. तिला पाहून तिचे सगळे रॅप साँगची खिल्ली उडवताना पाहायला मिळाले.ढिण्चॅक पूजाच्या येण्याने रॅपर आकाश ददलानी भलताच खुष होता. कारण पूजाही रॅपर आहे त्यामुळे आकाशलाही चांगली कंपनी मिळणार असल्याचे तो सतत बोलत असे.दरवेळी ढिण्चॅक पूजाचे कौतुक करताना आकाश दिसायचा त्यामुळे घरातल्या इतर स्पर्धकांनीही त्याचं नाव पूजासह जोडायला सुरूवात केली.सगळेच पूजाच्या नावाने आकाशला चिडवायचे आणि हे त्यालाही आवडायचे.इतकेच नाहीतर आकाश पूजाच्या प्रेमात आहे.तर पूजाला लव त्यागी आवडतो अशाही चर्चा घरात रंगातात. प्रियांक शर्मा, सब्यसाची, अर्शी खान, हितेन तेजवानी यांनी तर पूजा आणि लव त्यागीची हल्दी सेरेमनीही आयोजित केली. यात घरातील इतर सदस्यांनी या दोघांना हळद लावल्याचे पाहायला मिळाले.मात्र आता या सगळ्या लिंकअपच्या चर्चांमध्ये काहीही रस नसल्याचे पूजाने सांगितले.सब्यासाचीसह गप्पागोष्टी करत असताना तिने बॉयफ्रेडच्या अनेक गोष्टी सांगितल्या.पूजाची शिकागोच्या बॉयफ्रेंडची भेट कामानिमित्त झाली. स्वतःत्यानेच पूजाचे सोशल मीडियावरच रॅप साँग ऐकले.ते त्याला खूप आवडले. पूजासह काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.त्याच दरम्यान तो तिला आवडायला लागला.तो खूप चांगला मुलगा आहे. तो मला आवडत असल्याचे पूजाने स्पर्धक सब्यासाचीला सांगितले.कुटुंबियांना त्रास होईल अशी कोणतेच गैरवर्तन घरात करणार नाही किंवा अशा कोणत्याच गोष्टी बोलणार नाही ज्याने माझ्या फॅमिलीला त्रास होईल असे पूजाने सांगितले होते.माज्ञ आता पूजाच्या या रहस्याने इतर स्पर्धकांसह तिच्या फॅमिलीचीही रिअॅक्शन काय असणार हेच जाणून घेण्याची सा-यांची उत्सुकता नक्कीच असणार.
Troll:ढिंण्चॅक पूजाच्या आगमनाने बिग बॉसच्या घरात भूकंप,टीव्ही सेलेब्सला फॅन्स म्हणाले हे वागणं बरं नव्हे....
Troll:ढिंण्चॅक पूजाच्या आगमनाने बिग बॉसच्या घरात भूकंप,टीव्ही सेलेब्सला फॅन्स म्हणाले हे वागणं बरं नव्हे....