Bigg Boss11:ही स्पर्धक आहे विवाहीत,शाहिद अफ्रिदीची गर्लफ्रेड असल्याचा केला होता दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:34 IST2017-10-25T11:44:58+5:302017-10-25T17:34:22+5:30

बिग बॉसच्या घरात सहभागी होणा-या स्पर्धकांची घरात एंट्री होण्याआधीच बरीच चर्चा होते.कारण बाहेरच्या जगात त्यांच्या एक से बढकर एक ...

Bigg Boss11: The contestant is married, claiming that Shahid Afridi was a girlfriends | Bigg Boss11:ही स्पर्धक आहे विवाहीत,शाहिद अफ्रिदीची गर्लफ्रेड असल्याचा केला होता दावा

Bigg Boss11:ही स्पर्धक आहे विवाहीत,शाहिद अफ्रिदीची गर्लफ्रेड असल्याचा केला होता दावा

ग बॉसच्या घरात सहभागी होणा-या स्पर्धकांची घरात एंट्री होण्याआधीच बरीच चर्चा होते.कारण बाहेरच्या जगात त्यांच्या एक से बढकर एक कारनाम्यांमुळेच ते फेमस झालेले असतात.त्यांची हीच गोष्ट इनकॅश करण्यासाठीच त्यांना बिग बॉसच्या घरात सहभागी केले जाते.बाहेरच्या जगात धुमाकुळ घालणारे अनेकजण आजवर बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याचे आपण पाहिले आहेत. मग ते सेलिब्रेटी असो किंवा मग कॉमनर्स बाहेर धुमाकुळ घातल्यानंतर ते बिग बॉसच्या घरात एंट्री घेत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.सध्या बिग बॉस 11मध्ये अशीच एक स्पर्धक आहे जीने बाहेरच्या जगातही क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला होता.या प्रकरणामुळे शाहिद अफ्रिदीला मात्र खूप मनस्तापही सहन करावा लागला होता.आर्शी खानसह त्याचा काही संबंध नसल्याचे शाहिदला स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.अर्शी इथवरच थांबली नाही.तिने राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौरवर सेक्‍स रॅकेट चालवत असल्याचा आरोपही केला होता.अर्शीच्या म्हणण्यानुसार,राधे माँने अर्शीला सेक्स रॅकेटमध्ये सामिल होण्यास सांगितले होते.आता मात्र बाहेरच्या दुनियेत खूपच वादग्रस्त ठरलेली अर्शी खानचे एक गुढ रहस्य उघड झाले आहे.आतापर्यंत स्वत:ला शाहिद अफ्रिदीची गर्लफ्रेड सांगणारी अर्शी चक्क विवाहीत आहे.बिग बॉसच्या घरात हा खुलासा अर्शीने नाहीतर चक्क भाईजान सलमानेच केला आहे.विकेंड का वार या भागात सगळ्यांची शाळा घेत असताना सलमानने अर्शीलाही चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अर्शीचे मुलं तिची खूप आठवण काढत असल्याचे सांगत एकच हशा पिकला होता.कारण सलमान तिची मस्करी करत होता.अर्शीही विवाहीत नसल्याचे स्पर्धकांनाही माहित होते.मात्र चक्क दबंग सलमानला अर्शी विवाहीत असल्याचे का सांगावेसे वाटले असणार हाच प्रश्न अर्शीसह इतरांनाही पडला होता.

नेहमीच बिग बॉसमच्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री केलेल्या स्पर्धकांची बाहरेच्या जगात मात्र तुफान चर्चा होत असते. अशीच काहीशी चर्चा आता अर्शीवर होत आहे.सलमानने अर्शीची खेचलेली टर रसिकांनी मात्र खरोखरच मनावर घेतल्याचे दिसतेय.त्यामुळे सोशल मीडियावर बिग बॉसवर चर्चा होताच अर्शी खानवर नेटीझन्सने निशाणा साधला नाहीतरच नवल.कारण या घरात एंट्री घेतलेल्या स्पर्धकांची एक ना एक दिवस पोलखोल होतेच. कितीही लवपण्याचा प्रयत्न केला तरीही काहीही केल्या त्यांचे सत्य हे बाहेर येतेच.बिग बॉस 10चा विजेता ठरलेला मनवीर गुर्जरही बिग बॉसच्या घरात स्पर्धक नीतीभा कौलसह रोमान्स करताना दिसला होता.मात्र तो विवाहीत असल्याचा खुलासा बिग बॉसच्याच घरात झाला होता.त्यामुळे अनेकदा स्पर्धकांचे अनेक रहस्यांची याच घरात पोलखोल होते.त्यामुळे मनवीर सारखेच काहीसे अर्शी खानसह झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Bigg Boss11: The contestant is married, claiming that Shahid Afridi was a girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.