Bigg Boss11 :या स्पर्धकाने पँटमध्येच सगळ्यांसमोर केली लघूशंका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 17:40 IST2017-11-03T12:10:29+5:302017-11-03T17:40:29+5:30
सध्या बिग बॉस सिझन 11 पाहिजे तसा रसिकांची मनं जिंकण्यात अजुनही पाहिजे तसे यश मिळालेले.आतापर्यंतच्या गेल्या 10 सिझनमध्ये वादग्रस्त ...

Bigg Boss11 :या स्पर्धकाने पँटमध्येच सगळ्यांसमोर केली लघूशंका!
स ्या बिग बॉस सिझन 11 पाहिजे तसा रसिकांची मनं जिंकण्यात अजुनही पाहिजे तसे यश मिळालेले.आतापर्यंतच्या गेल्या 10 सिझनमध्ये वादग्रस्त स्पर्धकांनी वेगवेगळे फंड्यांचा वापर करत एक वेगळेच वळण दिल्याचे पाहायला मिळाले होते.गेल्या सिझनमध्ये प्रियंका जग्गाने वेगवेळे फंडे करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यात कॅप्टनशिपसाठी देण्यात आलेला टास्कमध्ये प्रियंका जग्गाने त्याच जागी पँटमध्ये लघूशंका केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी कपडे धुण्याचा काम व्हीजे बानीवर असल्यामुळे तिलाच ते कपडे धुवावे लागले होते.त्यानंतर प्रियंका जग्गावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर वाद झाला आणि तिची खिल्लीही उडवण्यात आली होती.घरातून बाहेर पडल्यानंतर तिने फेसबूक पोस्टमध्ये लिहिले होते, हो मी टास्कमध्ये टॉयलेट केले. ते काही अवघड नव्हते.माझ्या जीवनात सर्वात कठीण मुलांना जन्म देणे आणि तेही नॉर्मल डिलीव्हरी हे सर्वात कठीण होते, असेही ती म्हणाली होती.आता पुन्हा एकदा अशीच गोष्ट घडली आहे. कॉमनर म्हणून एंट्री मिळवलेला पुनीष शर्माने कॅप्टन्सीच्या टास्कदरम्यान सा-यांसमोरच पँटमध्ये लघुशंका केली.त्यामुळे हळुहळु पुन्हा एकदा बिग बॉस सिझन 10 ची पुनरावृत्ती यंदाच्या 11 व्या सिझनमध्ये पाहायला मिळत आहे.पुनीषवर ही परिस्थिती ओढावली त्याला कारण होते बिग बॉसकडून मिळालेले टास्क. कॅप्टनसी टास्कसाठी कंटेस्टंटला सायकलवर बसून सलग पाणी पित राहायचे आहे. असे करत असताना टॉयलेटला न जाता सायकलवर बसून सतत पाणी पित राहिल तो विजेता ठरणार आहे.त्यानुसार पुनीष शर्मा माघार न घेता सायकलवर बसून पाणी पित राहिला आणि सर्वांसमोर लघूशंका करत टास्क पूर्ण केले. त्यामुळे आता कॅप्टन्सीचा तोच दावेदार असणार आहे.अशाप्रकारे पुनीष बिग बॉसचा एकमेव कंटेस्टंट आहे, जो दोनवेळा घराचा कॅप्टन होणार आहे. याआधी विकास कॅप्टन असताना त्याने पुनीषवर हात उचलला होता, तेव्हा त्याला ही संधी मिळाली होती. बिग बॉसने विकासला शिक्षा करताना त्याची कॅप्टनसी काढून पुनीषला दिली होती. तेव्हा तो रिप्लेसमेंट कॅप्टन होता आता मात्र तो पूर्णपणे जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.बिग बॉसच्या घरात इंडियावाले म्हणून आलेल्या प्रियंका जग्गा हिचा घरातील प्रवास खूपच वादग्रस्त राहिला. पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेल्या प्रियंकाला वाइल्ड कार्डद्वारे पुन्हा घरात एंट्री देण्यात आली होती. त्यानंतर तिने घरात असा काही उच्छाद मांडला होता की, ज्यामुळे शोच्या निर्मात्यांना अन् दस्तुरखुद्द सलमान खानला तिला घराबाहेर काढावे लागले. मात्र घरातील तिची ही कृती अजिबात माफीच्या योग्य नसल्याने सलमानने त्याच्या स्टाइलमध्ये तिची घरातून हकालपट्टी केली होती. ‘लिव्ह माय होम’ अशा शब्दात त्याने तिला घराबाहेर काढले होते.