बिग बॉस : प्रियंका जग्गाने बिग बॉसवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 14:37 IST2016-12-27T14:33:43+5:302016-12-27T14:37:33+5:30

गैर वर्तणूक आणि अश्लाघ्य भाषेमुळे घराबाहेर हकालपट्टी केलेल्या प्रियंका जग्गाने आता बिग बॉसवर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. प्रियंका घराबाहेर पडताच तिचा भाऊ समीर याने सलमानवर निशान साधत त्याने टीआरपीसाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप केला होता. आता प्रियंकानेही यू-ट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करीत बिग बॉसवर आरोप केले आहेत.

Bigg Boss: Priyanka Jagga made serious allegations against Big Boss | बिग बॉस : प्रियंका जग्गाने बिग बॉसवर केले गंभीर आरोप

बिग बॉस : प्रियंका जग्गाने बिग बॉसवर केले गंभीर आरोप

र वर्तणूक आणि अश्लाघ्य भाषेमुळे घराबाहेर हकालपट्टी केलेल्या प्रियंका जग्गाने आता बिग बॉसवर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. प्रियंका घराबाहेर पडताच तिचा भाऊ समीर याने सलमानवर निशान साधत त्याने टीआरपीसाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप केला होता. आता प्रियंकानेही यू-ट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करीत बिग बॉसवर आरोप केले आहेत. 
५. ५२ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये प्रियंकाने म्हटले की, घरात माझी प्रकृती खूपच खराब झाली होती. मात्र बिग बॉसने मला कुठल्याही प्रकारची मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मला नाइलाजास्तव असे वागावे लागले. जेणेकरून बिग बॉसने मला स्वत:हून बाहेर काढाले. 

बिग बॉसने मला घराबाहेर काढावे यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार विनवण्या करीत होती. मला कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात नव्हता, त्याचबरोबर बाहेरून आलेले जेवणही नंतर बंद केले होते. त्यामुळे मला सलमानसोबत अशाप्रकारे वागावे लागले. मला जे वाटले ते मी केले, यात कोणाला वाईट वाटत असेल तर ‘आय डोंट नो’
पुढे बोलताना प्रियंका म्हणते की, बिग बॉसच्या घरात फक्त बल्डप्रेशर चेक केले जाते. कारण बिग बॉस मला वारंवार सांगत होते की, तुम्ही लोणावळ्यात आहात, डॉक्टरसाठी वेट करावाच लागेल. त्यामुळे मला मनू पंजाबीकडे असलेली औषधे खाऊन दोन दिवस काढावे लागले. माझी खरोखरच तब्येत खराब झाली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून मला बाहेर काढले असे जरी म्हटले जात असले तरी, अधिक काळ त्या घरात राहण्यास माझ्यात अजिबात हिंमत नव्हती, हेच वास्तव आहे. कारण त्या घरात माझ्यासाठी एक-एक मिनीट जहर खाण्यासारखे होते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यासाठी एक तर मला तोडफोड करावी लागली असती किंवा असे काही करावे लागले असते जेणेकरून त्या लोकांनी मला स्वत:हून घराबाहेर काढले असते. 



यावेळी प्रियंकाने सलमानवरही टीका केली. ती म्हणाली की, जर सलमान असा दावा करीत असेल की, मीच प्रियंकाला घराबाहेर काढले तर त्याने ते व्हिडीओ दाखवावेत जे लोकांनी बघितले नाहीत. सलमानचे माझ्यावर नाराज होण्याचे दुसरेही कारण आहे. ते म्हणजे त्याच्या बर्थडे विशसाठी जो डान्स केला गेला, त्यात मी सहभागी झाली नव्हती. त्यावेळी मी बिग बॉसला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, मी घरातील सदस्य नाही, मी घराबाहेर जाऊ इच्छिते. 

आता लोक माझ्याबाबतीत काय विचार करतात, हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे नाही. माझा पती, माझे सर्व मित्रपरिवार माझ्यासोबत असल्याने मी इतरांची तमा बाळगत नाही, असेही प्रियंका जग्गा हीने म्हटले आहे. प्रियंकाच्या या आरोपावर मात्र बिग बॉसकडून कुठल्याही प्रकारची स्पष्टोक्ती आलेली नाही. त्यामुळे प्रियंका जग्गा प्रकरण येथेच मिटणार की, आणखी त्याला दुसरे वळण घेणार हे सांगणे सध्या तरी शक्य नाही. 

Web Title: Bigg Boss: Priyanka Jagga made serious allegations against Big Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.