Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:09 IST2021-08-24T19:08:37+5:302021-08-24T19:09:09+5:30
बिग बॉसची निस्सीम समर्थक असलेल्या राखीने बिग बॉस ओटीटी स्पर्धकांबाबत तिचे मत व्यक्त केले.

Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूडची क्वीन राखी सावंतबिग बॉस ओटीटी सन्डे का वॉरमध्ये हजेरी लावली होती. बिग बॉसची निस्सीम समर्थक असलेल्या राखीने बिग बॉस ओटीटी स्पर्धकांबाबत तिचे मत व्यक्त केले.
घरामधील सर्वात कमकुवत कनेक्शन्स आणि सर्वात प्रबळ कनेक्शन्सबाबत विचारले असताना राखी सकारात्मकपणे प्रतिसाद देत म्हणाली, ''माझ्या मते घरामध्ये निशांत भट – मूस आणि प्रतिक सहेजपल – अक्षरा सिंग हे सर्वात प्रबळ कनेक्शन्स आहेत. ते नेहमीच एकमेकांना पाठिंबा देतात आणि गरजेच्या वेळी जोडीदाराच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्यांना पडद्यावर पाहताना खूपच चांगले वाटते. शमिता शेट्टी – राकेश बापट हे घरातील सर्वात कमकुवत कनेक्शन आहे, पण त्यांच्यामधील केमिस्ट्री खूपच छान असल्यामुळे त्यांनी त्यांच्यामधील प्रेम समोर आणले तर ते सर्वात प्रबळ कनेक्शन बनू शकतात.''
अधिक पुढे जात, राखी सावंतने मिलिंद गाबाच्या गेमबाबत तिचे मत व्यक्त केले. ती म्हणाली, ''मिलिंद गाबा हा पहिल्या सीझनमधील राहुल रॉय सारखा आहे, कोप-यात शांत राहत गेम खेळेल. पण बिग बॉसचा तिसरा डोळा आहे ना, तो सर्वकाही बघत आहे.'' ती शेवटी म्हणाली की, ''घरात जो एंटरटेनर असणार तोच राहणार.''