Bigg Boss OTT 2 : प्रतीक्षा संपली, आजपासून सुरू होतोय बिग बॉस OTT2, जाणून घ्या कोण आहेत स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:50 IST2023-06-17T12:46:50+5:302023-06-17T12:50:42+5:30
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे आजपासून सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या शोची खूप चर्चा आहे.

Bigg Boss OTT 2 : प्रतीक्षा संपली, आजपासून सुरू होतोय बिग बॉस OTT2, जाणून घ्या कोण आहेत स्पर्धक
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे आजपासून सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या शोची खूप चर्चा आहे. १७ जूनपासून या शोचे जिओ सिनेमा स्ट्रिमिंग होणार आहे. सलमान खानबिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीजनपासून आपला डेजिटल डेब्यू करणार आहे. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता.
बिग बॉसचे नवे घर कसे असेल, या घरात कोण कोण असणार, कोणते नवीन नियम असतील असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतीलच. याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बिग बॉस ओटीटीच्या या सीझनमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि स्टार्स स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. आलिया सिद्दीकी, आकांक्षा पुरी, अविनाश सचदेव, फलक नाज, जिया शंकर, बेबिका धुर्वे, मनिषा रानी, पलक पुरसवानी आणि दुबईतील मॉडल आणि अभिनेता देखील यात दिसणार आहे. पण अद्याप त्याचा चेहरा व नाव समोर आलेले नाही.
प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक उमंग कुमार यांनी बिग बॉसचं घर डिझाईन केलं आहे. 'बिग बॉस'ची टीम प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असते. यंदाच्या सीजनमध्ये घरातील सिटिंग अरेंजमेंट आणि फर्नीचर खूप भारी दिसत आहे. किचन, डायनिंग एरिया, गर्डन एरिया सर्व काही लक्ष वेधून घेत आहे.