'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकरसोबतच्या नात्यावर अखेर समृद्धी केळकरचा खुलासा; म्हणाली - 'मी त्याची…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:05 IST2023-02-27T17:05:19+5:302023-02-27T17:05:54+5:30
Samruddhi Kelkar : समृद्धी अभिनयाच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.

'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकरसोबतच्या नात्यावर अखेर समृद्धी केळकरचा खुलासा; म्हणाली - 'मी त्याची…'
स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. समृद्धी प्रोफेशनल लाइफसोबत तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर तिचे नाव जोडले जात आहे. याबाबत नुकताच तिने खुलासा केला आहे.
नुकतेच एका मुलाखतीत समृद्धीला अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, मी पहिले पहिले आमच्यावरचे व्हिडीओ पाहून कोमात गेले होते, माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आपल्या इंडस्ट्रीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारले, त्यावर मी आता उत्तर देते तो माझा खूप चांगला मित्र आहे. जवळपास ५ वर्ष आम्ही मित्र आहोत. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीच नाही.
‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या कार्यक्रमातून समृद्धी भेटीला आली आहे. या कार्यक्रमात ती सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आपल्याला दिसते. अभिनेता अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
समृद्धी एक उत्तम अभिनेत्रीसोबत नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. समृद्धीने याआधी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. तसेच ती पुढचं पाऊल व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्येही झळकली आहे.