Bigg boss marathi 3: 'मला स्वत:चा निर्णय घेऊ दे'; विशालने ठामपणे सांगणार गायत्रीला त्याचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 06:15 PM2021-10-01T18:15:17+5:302021-10-01T18:17:54+5:30

Bigg boss marathi 3: खुलजा सिमसिम हे नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. या टास्कसाठी हल्लाबोल टास्कमधल्या विजेत्या टीमने घरातील दोन स्पर्धकांची निवड केली आहे.

bigg boss marathi 3 vishal and gayatri conversation viral on social media | Bigg boss marathi 3: 'मला स्वत:चा निर्णय घेऊ दे'; विशालने ठामपणे सांगणार गायत्रीला त्याचं मत

Bigg boss marathi 3: 'मला स्वत:चा निर्णय घेऊ दे'; विशालने ठामपणे सांगणार गायत्रीला त्याचं मत

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या कॅप्टन्सी टास्कविषयी चर्चा सुरु असतानाच 'माझे निर्णय मला घेऊ दे', असं ठामपणे सांगतांना विशाल दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आता दररोज नवनवीन टास्क रंगताना दिसत आहेत. त्यामुळे हा शो आता खऱ्या अर्थाने सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आज ( १ ऑक्टोबर) खुलजा सिमसिम हे नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. या टास्कसाठी हल्लाबोल टास्कमधल्या विजेत्या टीमने घरातील दोन स्पर्धकांची निवड केली आहे. यात जय आणि गायत्री यांची निवड झाली असून त्यांच्यात हा नवा टास्क रंगणार आहे. याविषयीच आज घरात गायत्री आणि विशाल चर्चा करणार आहेत. 

नव्या कॅप्टन्सी टास्कविषयी चर्चा सुरु असतानाच 'माझे निर्णय मला घेऊ दे', असं ठामपणे सांगतांना विशाल दिसणार आहे. या नव्या टास्कचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 Bigg boss marathi 3: हल्लाबोल! महिला सदस्यांवर कचरा फेकल्यामुळे तृप्ती देसाई ट्रोल
 

“खेळात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याविषयी तुझं मत काय आहे? तुझ्यावर अन्याय झाला, तुमचीच लोकं.. हे असं व्हायला नको. कोणालाही मत देण्याची माझी अजिबात इच्छा नाही. जय तर माझ्याकडे मत मागायला आलाच नाही. त्यामुळे तो विषयच संपला. त्यामुळे आता मला स्वत:ला निर्णय घेऊ दे. जो काही निर्णय असेल तो तुला दिसेलच, असं विशाल गायत्रीला सांगणार आहे.

दरम्यान, “माझ्यावर विश्वास ठेव, मला इतकचं सांगायच आहे की, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही", असं गायत्री विशालला म्हणते. त्यामुळे आजच्या भागात नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: bigg boss marathi 3 vishal and gayatri conversation viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.