'बिग बॉस मराठी ३' फेम सोनाली पाटीलचा झाला होता अपघात, झाली होती गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:59 AM2022-06-14T11:59:11+5:302022-06-14T11:59:45+5:30

Sonali Patil : काही दिवसांपूर्वी सोनाली पाटीलचा पुण्यातील चाकण रोडवर अपघात झाला होता.

'Bigg Boss Marathi 3' fame Sonali Patil had an accident and suffered serious injuries | 'बिग बॉस मराठी ३' फेम सोनाली पाटीलचा झाला होता अपघात, झाली होती गंभीर दुखापत

'बिग बॉस मराठी ३' फेम सोनाली पाटीलचा झाला होता अपघात, झाली होती गंभीर दुखापत

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सोनाली पाटील, विकास पाटील, मीनल शाह आणि विशाल निकम यांच्या मैत्रीमुळे गाजला होता. या शोमुळे प्रसिद्धी मिळालेल्या सोनालीच्या फॅन फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झाली होती. नुकताच सोनालीचा अपघात झाला असल्याची बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या अपघाताची बातमी समजताच विकास पाटीलने सोनालीची भेट घेतली होती आणि लवकर बरी हो असे कॅप्शन देऊन त्याने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये सोनालीच्या हाताला दुखापत झाली असल्याचे समोर आले होते. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत नुकतीच तिने माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सोनाली पुण्यातील चाकण रोडवरून मित्रासोबत बाईकने जात होती. मागून भरधाव येणाऱ्या एका बाईकस्वाराने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनालीसह तिचा बाईक चालवणारा मित्र देखील खाली पडला. धडक जोरदार बसल्याने सोनाली जागीच बेशुद्ध पडली. अपघात झाल्यानंतर जमावाने सोनालीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला काही काळ आयसीयूमध्ये भरती केले होते.

उपचारानंतर सोनालीला घरी विश्रांतीसाठी जाण्याची परवानगी दिली. या अपघातात तीच्या मानेलादेखील जोरदार हिसका बसला होता. त्यामुळे अजूनही मानेला त्रास होत असल्याचे ती सांगते. तर सोनालीच्या हाताला गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे आधारासाठी तिने आर्म स्लिंग घातली होती. सोनालीचा हाच फोटो विकासने सोशल मीडियावर शेअर केलेला पाहायला मिळाला. त्यावरून सोनालीचा अपघात झाल्याचे तिच्या चाहत्यांना कळले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी अपघाताबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वतः सोनालीनेच एक व्हिडिओ शेअर करून या अपघाताची माहिती दिली.

Web Title: 'Bigg Boss Marathi 3' fame Sonali Patil had an accident and suffered serious injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.