Bigg Boss Marathi 3 “मी रावण आहे” म्हणत विकास पाटील संतापला,आजच्या भागात यामागचं कारण येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:41 PM2021-10-29T12:41:57+5:302021-10-29T12:42:33+5:30

विशाल विकासला म्हणाला, दोन तोंडाचा वापर नको रे एक ठाम मत दे. त्यावर विकास म्हणाला, दोन नाही दहा तोंड आहेत मला.

Bigg Boss Marathi 3, Day 30 : vishal Nikam Accuses vikas Patil of playing a double game; says Yes I Am Rawan | Bigg Boss Marathi 3 “मी रावण आहे” म्हणत विकास पाटील संतापला,आजच्या भागात यामागचं कारण येणार समोर

Bigg Boss Marathi 3 “मी रावण आहे” म्हणत विकास पाटील संतापला,आजच्या भागात यामागचं कारण येणार समोर

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क सुरू झाला. टीमने स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित केले. आता या दोघींमध्ये कोण बनणार घरचा नवा कॅप्टन ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बरीच वादावादी बघायला मिळाली. घरामध्ये जरी दोन स्ट्रॉंग ग्रुप असले तरीदेखील ग्रुपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रुपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसतं आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये वा कुठतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो, वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून कायम निर्णय घेताना दिसतात. पण आता याच्यामध्येच दुरावा येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मीरा आणि गायत्रीच्या संभाषणावरून हे कुठतेरी स्पष्ट झाले. तर विकास आणि विशालमधील वाद बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे असे दिसून येते आहे. कालदेखील विकास जेव्हा विशालकडे टास्कबद्दल बोलायला गेला तेव्हा विशालने त्याला योग्य ते उत्तर न दिल्याने विकासला वाईट वाटले. आज देखील दोघांमध्ये वाद होणार आहे. आता नक्की या वादाचे कारण काय ?हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
 
विशाल विकासला म्हणाला, दोन तोंडाचा वापर नको रे एक ठाम मत दे. त्यावर विकास म्हणाला, दोन नाही दहा तोंड आहेत मला. मी रावण आहे. विशाल म्हणाला, रावणाचा शेवटी अंत झाला हे लक्षात ठेव. विकास म्हणाला, ठीक आहे चालेल अंत प्रत्येकाचा आहे, अमर कोणी नाहीये इथे सगळे मारायला आले आहेत. मरेन पण दहा तोंड असलेला रावण म्हणून मरेन, तुझ्यासारखा सामान्य माणूस म्हणून मरणार नाही. विशाल म्हणाला, “मी सामान्य माणूस आहे आणि मी खुश आहे....” हा वाद पुढे असाच वाढत राहिला... आता हा वाद टास्क दरम्यान झाला ? कशावरुन झाला ? याचे कारण आजच्या भागामध्ये समोर येईलच.


 

Web Title: Bigg Boss Marathi 3, Day 30 : vishal Nikam Accuses vikas Patil of playing a double game; says Yes I Am Rawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.