बिग बॉसच्या घरात ‘पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 13:02 IST2016-11-11T12:59:58+5:302016-11-11T13:02:03+5:30

खुर्ची, सत्ता यासाठी कुणी काय करेल याचा नेम नाही. कोण आपले, कोण परके याचा भेदही कळणे अशक्यच. याच खुर्ची ...

Bigg Boss house 'Political Surgical Strike'! | बिग बॉसच्या घरात ‘पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक' !

बिग बॉसच्या घरात ‘पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक' !


/>खुर्ची, सत्ता यासाठी कुणी काय करेल याचा नेम नाही. कोण आपले, कोण परके याचा भेदही कळणे अशक्यच. याच खुर्ची आणि पदासाठी सारं काही पणाला लावण्याची तयारी असते. त्यामुळेच की काय बिग बॉसकडून घरातील सदस्यांवर पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर सुरु झाला पॉलिटिकल गेम. इंडियावाले आणि सेलिब्रिटी एकत्र आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा फूट पाडण्यासाठी बिग बॉसची ही खेळी. या खेळीत घरातले सदस्य अडकणार हे तर नक्कीच होते. कारण खुर्ची आणि पद कुणाला नको असते. खुर्ची की मिर्ची हा खेळ वाटतो तितका सोपा नव्हता. तसा हा खेळ बिग बॉसच्या घरात नेहमीच रंगतो. या खेळातूनच ठरतो आठवड्यातील घराचा कॅप्टन. हा खेळ घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी होता. मात्र खुर्ची आणि पदाच्या रेसमध्ये पुढे आले घरातले तीन महारथी. बानी, स्वामी ओम आणि मनवीर या तीन महारथींना घरातील सर्वोच्च पद आणि खुर्ची हवीच होती. हे पद आणि खुर्ची मिळवण्यासाठी या तिघांनाही घरातील सदस्यांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळवायचा होता. त्यामुळे प्रत्येक सदस्याला आपल्याकडे खेचण्यासाठी या तिघांकडून नेत्यांप्रमाणे आश्वासने दिली जाऊ लागली. आम्ही हे करु, आम्ही ते करु.मला जर तुमचा  कॅप्टन निवडलं तर तुमच्यासाठी वाट्टेल ते करु, तुमच्या सुखातच माझे सुख अशी राजकीय नेत्यांनाही लाजवतील अशी आश्वासने या तिघांकडून दिली गेली. 



घरातील प्रत्येक सदस्याला आपल्याकडे खेचण्यासाठी या तिघांनी फोडा आणि राज्य करा ही  इंग्रजांची नीती अवलंबली. बानीला सेलिब्रिटींचा तर मनवीर काही इंडियावाल्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला. यांत गोची झाली ती स्वामी ओम यांची. आपली डाळ शिजत नसल्याचे पाहून त्यांनी कधी मनवीर तर कधी बानीकडील सदस्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. आपणच किती साधे, सभ्य असल्याचा आव आणण्याची संधी स्वामी ओम यांनी सोडली नाही. मात्र हाच डाव स्वामीच्या अंगाशी आला आणि त्यांचे समर्थक सदस्य बानीच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. अखेर बिग बॉसच्या खुर्चीच्या या खेळात बानीला विजयी घोषित करण्यात आले. 



सगळे वोट मिळवत बानी या घरातली पहिली कॅप्टन घोषित झाल्यानंतर ''हमारा नेता कैसा हो, हमारा नेता बानी जैसा हो'' असे घोषणा स्वामी ओमजी करत सुटले.आता घरातील पहिला कॅप्टन बनण्याचा मान मिळाल्याने बानीची अवस्था आज मैं ऊपर आसमाँ नीचे अशीच काहीशी झाली. कारण यामुळे तिला जुने हिशेब चुकते करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. शिवाय घरातील सदस्यांचे नेतृत्व करणार असल्याने या आठवड्यात ती सेफ झाली. बिग बॉसच्या गृहयुद्धाची ही तर सुरुवात आहे. कारण यानंतर बिग बॉसच्या घरात रंगणार आहे महाभारत. 

Web Title: Bigg Boss house 'Political Surgical Strike'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.